मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Mission Begin Again मध्ये राज्यात काय सुरू आणि काय बंद राहणार? वाचा एका क्लिकवर

Mission Begin Again मध्ये राज्यात काय सुरू आणि काय बंद राहणार? वाचा एका क्लिकवर

2 सप्टेंबरपासून खाजगी बसमधून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच, हॉटेल आणि लॉज यांना 100 टक्के क्षमतेने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

2 सप्टेंबरपासून खाजगी बसमधून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच, हॉटेल आणि लॉज यांना 100 टक्के क्षमतेने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

2 सप्टेंबरपासून खाजगी बसमधून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच, हॉटेल आणि लॉज यांना 100 टक्के क्षमतेने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

  • Published by:  Priyanka Gawde
मुंबई, 01 सप्टेंबर : राज्य सरकारनं मिशन बिगीन अगेन म्हणत अनलॉक-4 च्या (Unlock-4) गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. त्यामुळे 2 सप्टेंबरपासून खाजगी बसमधून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय कोणत्याही निर्बंधाशिवाय यापुढे आऊटडोर किंवा खुल्या जागेमध्ये व्यायाम आदी कार्ये करता येतील. हॉटेल आणि लॉज यांना 100 टक्के क्षमतेने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या ठिकाणी निर्बंध कायम 1.शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक आणि कोचिंग संस्था बंद राहतील. ऑनलाईन शिक्षणाला संमती असेल व त्यास प्रोत्साहन दिले जाईल. 2. चित्रपटगृहे, स्विमिंग पूल, करमणुक केंद्रे, थिएटर्स (मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सेसमधील थिएटर्ससह), बार, सभागृहे, असेंब्ली हॉल्स आणि यासारखी ठिकाणे बंद राहतील. 3. केंद्रीय गृह विभागाने संमती दिलेली वगळून प्रवाशांची इतर आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक बंद राहील. 4. मेट्रो रेल्वे बंद राहतील. 5. सामाजिक, राजकीय, क्रिडाविषयक, करमणूकविषयक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आणि इतर मोठे सभा, समारंभ बंद राहतील. या ठिकाणी मिळणार सूट 1. अत्यावश्यक नसलेल्या सेवांची दुकाने सुरु राहतील. मद्याची दुकाने सुरु राहतील. 2. हॉटेल (उपहारगृहे )आणि लॉज (निवासगृहे) यांना १०० टक्के क्षमतेने सुरु करण्याची परवानगी देण्यात येत आहे. 3. संपूर्ण महाराष्ट्रासाठी अ व ब गटातील अधिकाऱ्यांची यापुढे 100 टक्के उपस्थिती राहील. तर, खाजगी कार्यालयांमध्ये गरजेनुसार 30 टक्के कर्मचारी उपस्थित राहू शकतील. 4. खाजगी बस / मिनी बस आणि इतर साधनांमधून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात येत आहे. 5. कोणत्याही निर्बंधाशिवाय आऊटडोर किंवा खुल्या जागेमध्ये व्यायाम आदी कार्ये करता येतील. 6. सार्वजनिक आणि खाजगी वाहनांमध्ये पुढीलप्रमाणे संमती देण्यात येत आहे. टॅक्सी, कॅब, ॲग्रीगेटर यांना फक्त अत्यावश्यक सेवेसाठी 1 अधिक 3 या प्रवासी क्षमतेनुसार, रिक्षांमध्ये 1 अधिक 2 या प्रवासी क्षमतेनुसार, चारचाकी वाहनामध्ये फक्त अत्यावश्यक सेवेसाठी 1 अधिक 3 या प्रवासी क्षमतेनुसार तर दुचाकीसाठी 1 अधिक 1 प्रवासी क्षमतेनुसार (हेल्मेट आणि मास्कसह) चालवण्याची परवानगी राहील. वाहनांमध्ये मास्क परिधान करणे अनिवार्य राहील. 7. मास्क परिधान करणे, सामाजिक अंतर राखणे आणि स्वच्छतेविषयक काळजी घेणे आदी आवश्यक खबरदारीसह अत्यावश्यक नसलेल्या बाबींसाठीही व्यक्ती प्रवास करु शकतात.
First published:

Tags: Corona, Corona virus in india, Lockdown

पुढील बातम्या