मुंबई, 9 ऑगस्ट : मुंबईच्या लोकलमध्ये अनेकांच्या कित्येक वस्तू हरवल्या असतील. काहींच्या सापडतात तर काहींच्या हाती काहीच लागत नाही. कालांतराने तर आपलं काही हरवलं होतं, हेच विसरुन जातात. मात्र मुंबईतील लोकलमध्ये एक अनोखा प्रकार घडला आहे. 14 वर्षांपूर्वी एका व्यक्तीची पर्स लोकलमध्ये हरवली होती. आज इतक्या वर्षांनी ही पर्स सापडली आहे. इतकचं नाही तर या पर्समधील पैसेही शाबूत होते.
हेमंत पेडलकर 2006 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल लोकल ट्रेनमधून प्रवास करीत होते. ज्यावेळी त्यांची पर्स ट्रेनमध्येच हरवली. या एप्रिल महिन्यात हेमंत यांना जीआरपीकडून कॉल गेला आणि 14 वर्षांपूर्वी हरवलेली तुमची पर्स सापडल्याचे त्यांनी सांगितले. मात्र एप्रिल महिन्यात लॉक़डाऊनमध्ये त्यांना पर्स घेण्यासाठी जाता आलं नाही. लॉकडाऊन शिथिल होताच पेडलकर जे पनवेलमध्ये राहतात त्यांनी वाशी जीआरपी ऑफिसमधून आपली पर्स घेतली. यानंतर पोलिसांनी त्यांच्या पर्समधील 900 रुपये हेमंत यांच्या स्वाधीन केले.
हे वाचा-मुंबईत कोरोनाचा रुग्ण आता फक्त आवाजावरूनही सापडणार, असा आहे पालिकेचा नवा प्लॅन!
हेमंत पेडलकर यांनी सांगितले की माझ्या पर्समध्ये 900 रुपये होते. ज्यामध्ये एक 500 ची नोट होती, जिच्यावर 2016 मध्ये बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांनी हेमंतला 300 रुपये दिले आणि स्टॅम्प पेपर कामासाठी 100 रुपये कापले. हेमंतने सांगितले की पोलीस त्यांना 500 रुपये बदलून देणार आहे.
हेमंत यांनी सांगितले की, जेव्हा ते जीआरपी ऑफिस गेले तेव्हा तेथे अनेकजणं आपले चोरीला गेलेले पैसे घेण्यासाठी आले होते. यामधील हजारो नोटा या नोटाबंदीत बंद करण्यात आलेल्या आहेत. पर्स मिळाल्यानंतर हेमंत पेडलकर म्हणाले की पैसे मिळाल्यानंतर ते खूप आनंदात आहेत. एक जीआरपी अधिकाऱ्यांनी सांगितले की ज्याने हेमंत यांची पर्स चोरली होती, त्याला काही काळासाठी ताब्यात घेण्यात आलं होतं. पोलिसांनी हेमंत यांना 300 रुपये दिले. 500 रुपयांची नोट बदलून देणार असल्याचे हेमंत यांनी सांगितले.