माणिकराव गावितांच्या पीएचं अपहरण? गुजरातमध्ये 'अशा' अवस्थेत सापडले

माणिकराव गावितांच्या पीएचं अपहरण? गुजरातमध्ये 'अशा' अवस्थेत सापडले

गेल्या दोन दिवसांआधी भगवान गिरासे हे मुंबईच्या टिळक भवनाजवळून बेपत्ता झाले होते. मुंबई पोलीस गेल्या 2 दिवसांपासून त्यांचा शोध घेत आहेत. अखेर ते गुजरामध्ये सापडले आहेत.

  • Share this:

प्रफुल्ल साळुंके, प्रतिनिधी

मुंबई, 01 एप्रिल: काँग्रेसचे माजी खासदार माणिकराव गावित यांचे पीए भगवान रामचंद्र गिरासे हे सापडले आहेत. गेल्या दोन दिवसापासून भगवान गिरासे हे बेपत्ता होते. अखेर त्यांचा शोध लागला आहे. भगवान गिरासे यांचं अपहरण झालं असल्याची शंका आता व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या दोन दिवसांआधी भगवान गिरासे हे मुंबईच्या टिळक भवनाजवळून बेपत्ता झाले होते. मुंबई पोलीस गेल्या 2 दिवसांपासून त्यांचा शोध घेत आहेत. अखेर ते गुजरामध्ये सापडले आहेत. सगळ्यात धक्कादायक म्हणजे भगवान यांचे केस आणि मिश्या कापलेल्या अवस्थेत ते गुजरातला सापडले.

मुंबई पोलिसांनी भगवान यांना त्यांच्या घरी सुपूर्द केलं असून त्यांचं अपहरण केलं असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. घरी आणल्यापासून भगवान गिरासे अजूनही गुंगीत आहे. ते कोणत्याही प्रश्नाची उत्तरं देत नाहीत. तर त्यांच्या मानेवर इंजेक्शन दिल्याची सूज आहे. त्यामुळे पोलिसांनी यावर वेगळीच शंका व्यक्त केली आहे. त्यानुसार आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

'मी रेल्वेतून पडलो'फक्त ऐवढंच भगवान यांना आठवत आहे. त्यांच्यावर सध्या घरीच उपचार सुरू आहेत. तर पोलीस या प्रकरणात आता अधिक कपास करत आहेत.


SPECIAL REPORT: कधी संपणार प्रदेश काँग्रेसमधल्या लाथाळ्या?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 10:33 AM IST

ताज्या बातम्या