मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

UPSC परीक्षेत यश मिळवणाऱ्या मिस इंडिया फायनलिस्ट ऐश्वर्याने पोलिसात दाखल केली तक्रार

UPSC परीक्षेत यश मिळवणाऱ्या मिस इंडिया फायनलिस्ट ऐश्वर्याने पोलिसात दाखल केली तक्रार

ऐश्वर्या शिवराण आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण ऐश्वर्याने पोलिसात एक तक्रार दाखल केली आहे.

ऐश्वर्या शिवराण आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण ऐश्वर्याने पोलिसात एक तक्रार दाखल केली आहे.

ऐश्वर्या शिवराण आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण ऐश्वर्याने पोलिसात एक तक्रार दाखल केली आहे.

  • Published by:  Akshay Shitole

नवी दिल्ली, 05 ऑगस्ट : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीतील एका नावाची देशभर चर्चा झाली. मिस इंडिया फायनलिस्ट राहिलेल्या मॉडेल ऐश्वर्या शिवराण हिने या परीक्षेत यश मिळवत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मात्र हिच ऐश्वर्या शिवराण आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण ऐश्वर्याने पोलिसात एक तक्रार दाखल केली आहे.

युपीएससी परीक्षेतील यशामुळे ऐश्वर्याविषयी जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. मात्र याचाच गैरफायदा घेत काही लोकांनी इन्स्टाग्रामवर ऐश्वर्याच्या नावाने फेक अकाऊंट्स सुरू केले आहेत. तसंच या अकाऊंटवरून ऐश्वर्याचे फोटोही शेअर केले जात आहेत. 'माझ्या परवानगीशिवाय काही लोक इन्स्टाग्राम अकाऊंट्सवरून माझे फोटो शेअर करत आहेत,' असं ऐश्वर्याने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. भविष्यात या अकाऊंटचा गैरवापरही केला जाऊ शकतो. त्यामुळे ऐश्वर्याने पोलिसात धाव घेतली आहे.

ऐश्वर्याने कसं मिळवलं UPSC परीक्षेत यश?

UPSC civil Service साठी झालेल्या या परीक्षेत देशभरातून 829 महत्त्वाकांक्षी युवक युवती निवडले गेले आहेत. याच परीक्षेत हरियाणाचा प्रदीप सिंह देशात पहिला आला. मात्र या सगळ्यात एक नाव चर्चेत आहे ते म्हणते ऐश्वर्या शिवराण (Aishwarya Sheoran). ऐश्वर्याने या परीक्षेत 93वा क्रमांक मिळवला आहे. मुख्य म्हणजे ऐश्वर्या फक्त UPSCमधील यशस्वी उमेदवारांच्या यादीतच नाही तर ती मिस इंडिया फायनलिस्टही (Femina Miss India) होती.

टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्याने सांगितले की, तिच्या आईने ऐश्वर्या रायच्या नावावरून तिचे नाव ठेवले होते. कारण आईची इच्छा होती ती ऐश्वर्यानेही मिस इंडिया व्हावे. त्यानंतर मिस इंडियाच्या 21 फायनलिस्टमध्ये तिची निवड झाली. मात्र ऐश्वर्याचे स्वप्न हे सिव्हिल सर्व्हिसमध्ये काम करायचेच होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऐश्वर्याने मॉडेलिंग कारकीर्दीतून ब्रेक घेतला आणि सिव्हिल सर्व्हिस परीक्षेची तयारी सुरू केली आणि आता त्यात य़शस्वीसुद्धा यशस्वी झाली.

First published:

Tags: Upsc exam