...आणि काँग्रेस-शिवसेनेत पुन्हा झालं 'मिस कम्युनिकेशन', संजय राऊतांनी केला खुलासा

...आणि काँग्रेस-शिवसेनेत पुन्हा झालं 'मिस कम्युनिकेशन', संजय राऊतांनी केला खुलासा

' अहमद पटेल यांच्याशी बोलणं झालं. थोडंसं मिस कम्युनिकेशन झालं. त्यामुळे थोडी गडबड झाली. ती पुढे होणार नाही याची काळजी घेऊ.'

  • Share this:

मुंबई 13 जानेवारी : CAAच्या मुद्यावरून काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी दिल्लीत सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला शिवसेना (Shiv Sena) उपस्थित नसल्याने चर्चा सुरु झाली होती. काँग्रेसने(Congress) शिवसेनेला निमंत्रणच दिलं नाही असंही समोर आलं होतं. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेत पुन्हा एकदा मिस कम्युनिकेशन झालं असल्याचं उघड झालंय. त्यावरून खुलासा करताना संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी आमचा संपर्क झाला आहे. माझं काहीवेळा पूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी बोलणे झाले. त्यानंतर अहमद पटेल यांच्याशी बोलणं झालं. थोडंसं मिस कम्युनिकेशन झालं. त्यामुळे थोडी गडबड झाली. ती पुढे होणार नाही याची काळजी घेऊ असा खुलासा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय.

राऊत पुढे म्हणाले, याआधी मुख्यमंत्र्यानी भूमिका स्पष्ट केलीय, या कायद्यात काही त्रुटी आहेत त्या दूर झाल्या पाहिजेत. देशभरात जे वादळ या कायद्यावरून निर्माण झालंय ते पाहता सर्व स्तरातून त्याला विरोध होतोय. या कायद्याने हिंदु मुसलमान अशी विभागणी करून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. पण त्याला यश आलं नाही. राज्यात सर्व जाती धर्माचे लोक असतात.

'आज के शिवाजी, नरेंद्र मोदी'; वादग्रस्त पुस्तक मागे घेण्याची भाजपची घोषणा

जिथे भाजपची राज्य असतात तिथे सर्वात हिंसक आंदोलने झाली. हे पाहाता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी भूमिका घेतली की हा कायदा जबरदस्तीनं लादला जाणार नाही जोपर्यंत काही गोष्टींवर खुलासा होत नाही. आणि जे देशाचे नागरिक आहेत त्यांच्या केसाला धक्का लागू देणार नाही मग ते कोणत्याही जाती धर्माचे असतो इतकी स्पष्ट भूमिका घेतल्यानंतर आमचे कुणाशी मतभेद असल्याचा प्रश्नच येत नाही.

शरद पवारांना जाणता राजा म्हटलेलं चालतं का? भाजपचा विरोधकांना सवाल

कायद्यात काही त्रुटी आहे शंका आहेत त्या दूर करणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणालेत. त्या परिस्थितीत कायदा कोणावर लादता येणार नाही. ते असेही म्हणालेत की या राज्यात जे नागरिक राहतात ते कोणत्याही जाती धर्माचे असोत त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही.

सत्ता स्थापनेच्या वेळीही काँग्रेस आणि शिवसेनेत योग्य संवाद नसल्याचं अनेकदा उघड झालं होतं. त्यामुळे सत्ता स्थापनेला वेळही लागला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 13, 2020 05:19 PM IST

ताज्या बातम्या