‘OBC आरक्षणला धक्का लागणार नाही, पसरविला जातोय गैरसमज’, राष्ट्रवादी आक्रमक

‘OBC आरक्षणला धक्का लागणार नाही, पसरविला जातोय गैरसमज’, राष्ट्रवादी आक्रमक

'राज्य सरकार ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार आहे असा गैरसमज विरोधकांकडून पसरवला जातोय. मात्र धक्का लावलेला आम्हीही सहन करणार नाही. महाराष्ट्रात अशा कोणत्याही कृतीला किंवा घटनांना राष्ट्रवादी पाठबळ देणार नाही.'

  • Share this:

मुंबई 13 ऑक्टोबर: राज्य सरकार ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार आहे असा गैरसमज विरोधकांकडून पसरवला जातोय. मात्र धक्का लावलेला आम्हीही सहन करणार नाही. महाराष्ट्रात अशा कोणत्याही कृतीला किंवा घटनांना राष्ट्रवादी पाठबळ देणार नाही अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. पक्षाच्या ओबीसी सेलच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राष्ट्रवादीने या आधीही मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही अशी भूमिका जाहीर केली होती. या प्रश्नावर राष्ट्रवादी आता आक्रमक भूमिका घेणार असल्याचे  संकेतच पाटील यांनी दिले आहेत.

जयंत पाटील म्हणाले, काही राजकीय पक्ष मंदिरं उघडा अशी मागणी करत आहेत. महाराष्ट्रात जेवढे व्यवहार सुरू झालेत तेवढा कोरोना वाढला आहे. त्यामुळे एकत्रित माणसं गोळा होण्याचं टाळलं पाहिजे. सर्व धर्माच्या लोकांनी गर्दी करु नये हे तत्व स्वीकारले पाहिजे. आम्ही उपजीविकेची साधने ओपन केली आहेत. नवरात्र उत्सव मर्यादित स्वरूपात साजरा करावा असे स्पष्ट केले आहे. आम्ही मर्यादित तत्वावर काम करतोय. त्यामुळे सर्वच धर्मांना विनंती करतोय. ज्यांना धर्माशिवाय जमत नाही ते धर्माचे राजकारण करत आहेत असेही जयंत पाटील म्हणाले.

कोरोनाची नोव्हेंबरमध्ये आणखी लाट येण्याची शक्यता आहे त्यामुळे सांभाळून पावले टाकली पाहिजेत असेही जयंत पाटील म्हणाले.

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार? देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाचे विधान

ओबीसींना आरक्षण देणार हे जालना येथे पवारसाहेबांनी जाहीर केले आणि एका महिन्यात आरक्षण जाहीर केले. अठरापगड जातींना आरक्षण मिळाले पाहिजे म्हणून आरक्षण लागू केले त्यावेळी सुप्रीम कोर्टानेही त्यावर शिक्कामोर्तब केले होते अशी आठवण छगन भुजबळ यांनी यावेळी बोलताना करून दिली.

ओबीसींना 17 टक्के आरक्षण आहे. ओबीसी ही जात नाही तर वर्ग आहे. आरक्षण हे गरिबी हटाव यासाठी नाही तर हजारो वर्षे ज्या जातींवर जुलुम झाला त्या जातींना सक्षम करण्यासाठी आहे. शाहू महाराजांनी राज्यकर्ते म्हणून त्यावेळी आरक्षण दिले त्यानंतर बर्‍याच वर्षांनी राज्यकर्ते म्हणून शरद पवारसाहेबांनी आरक्षण दिले याची आठवण छगन भुजबळ यांनी करुन दिली.

Hathras Case: पीडित मुलीच्या वडिलानंतर आता आईचीही प्रकृती बिघडली

ओबीसी समाज 400 जातींमध्ये विभागला गेला आहे. या समाजात अनेक नेते आहेत. हा दबलेला समाज आहे. तो एकत्र यायला तयार नाही. मात्र शरद पवारांनी सर्वांना एकत्र आणण्याचं काम केलं असंही भुजबळ म्हणाले.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 13, 2020, 5:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading