12 तासात, 5 हार्टअॅटॅक्स... त्यातूनही 'ती'नं केली मृत्यूवर मात !

12 तासात, 5 हार्टअॅटॅक्स... त्यातूनही 'ती'नं केली मृत्यूवर मात !

शस्त्रक्रियेदरम्यान तिला पाचवेळा ह्रदयविकाराचे झटके आले, पण डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले आणि तिचे प्राण वाचवले.

  • Share this:

मनोज कुलकर्णी, मुंबई

13 मे : हृदयविकाराचा धक्का एखाद्या व्यक्तीसाठी जीवघेणा ठरू शकतो. मात्र, मुंबईत जन्माला आलेली चार महिन्यांची चिमुरडी याबाबतीत खरोखर सुदैवी म्हणावी लागेल. हृदयदोषासह जन्म झालेल्या विदिशावर 12 तासांची शत्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेदरम्यान तिला पाचवेळा ह्रदयविकाराचे झटके आले, पण डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले आणि तिचे प्राण वाचवले.

कल्याणमध्ये राहणाऱ्या विनोद आणि विशाखा वाघमारेंच्या या चिमुकलीचा फेब्रुवारीत जन्म झाला. तिला जन्मजात ह्रदयाचा आजार होता, त्यासाठी तिला स्थानिक डॉक्टरांनी परळच्या वाडिया रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं.

विनोद वाघमारे एका खासगी कंपनीत कार्यरत आहेत, बाळाच्या उपचारासाठी 5 लाखांचा खर्च येणार होता. त्यांनी काही रुपये जमा केले. बाकीचे पैसे वाडिया हॉस्पीटलने पुढाकार घेऊन सामाजिक संस्थांच्या मदतीने उभे केले आणि बाळावर शस्त्रक्रिया करण्याचं ठरलं.

डॉक्टरांनी तिच्यावर तब्बल 12 तास शस्त्रक्रीया केली. या शस्त्रक्रियेदरम्यानच या दीड महिन्याच्या बाळाला 5 वेळा ह्रदयविकाराचा झटका आला. ऐकून काळजात चर्ररर झालं ना... पण हे खरं आहे... पाचवा झटका तर 15 मिनिटांचा होता. पण डॉक्टरांनी मोठ्या हिमतीनं ही शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली.

मोठ्यांनाच ह्रदयविकाराचा झटका येतो असं नाही, तर नवजात बालकांनाही येऊ शकतो. पण वेळीच उपचार होणं मात्र गरजेचं आहे. डॉक्टरला देवदूत म्हटलं जातं, आणि वाडियाचे डॉक्टर खरोखरंच या मुलीसाठी देवदूत ठरले आणि या चिमुकलीला नवं आयुष्य मिळालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 13, 2017 02:09 PM IST

ताज्या बातम्या