Home /News /mumbai /

डिलिव्हरी बॉय मुस्लिम असल्यामुळे सामान नाकारलं, पोलिसांनी केली अटक

डिलिव्हरी बॉय मुस्लिम असल्यामुळे सामान नाकारलं, पोलिसांनी केली अटक

सामानाची डिलिव्हरी करण्यासाठी आलेला मुलगा मुस्लिम असल्यामुळे एक रहिवाश्यानं सामना घेण्यास नकार दिला.

    मुंबई, 23 एप्रिल : जीवाची पर्वा न करता लॉकडाऊनच्या काळात आजही लोकांना घरपोच किराणा सामना पोहचवले जात आहे. मात्र या सगळ्यात मीरा रोडमध्ये एक भयंकर प्रकार घडला. सामानाची डिलिव्हरी करण्यासाठी आलेला मुलगा मुस्लिम असल्यामुळे एक रहिवाश्यानं सामना घेण्यास नकार दिला. परिणामी मीरा रोड येथील रहिवासी असलेल्या या इसमाला बुधवारी त्याच्या सृष्टी कॉम्प्लेक्समधील राहत्या घरातून अटक करण्यात आली. त्याला ठाणे सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, हा प्रकार मंगळवारी (21 एप्रिल) रोजी घडला. 32 वर्षीय मुस्लिम मुलानं ऑनलाईन मागवलेल्या सामानाची डिलिव्हरी करण्यासाठी सृष्टी कॉम्प्लेक्समध्ये गेला. मास्क आणि गोल्व्ह्जचा वापर केला असतानाही, त्या व्यक्तीने डिलिव्हरी बॉयकडून सामान घेण्यास नकार दिला. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना डिलिव्हरी बॉय म्हणाला की, "जीवाची पर्वा न करता मी लोकांना घरपोच किराणा देत आहे. मात्र अशा कठिण काळातही लोकांना धर्माचा विचार करायचा आहे, हे खूप भयंकर आणि दु:खद आहे". दरम्यान पोलिसांनी सदर इसमावर कलम 295 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वाचा-सरकारी कर्मचारीच गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकला,पोलिसांनी शिकवला धडा VIDEO सामान घरपोच पोहचवण्यासाठी सदर इसमाच्या बिल्डिंग खाली हा मुलगा गेला होता. सदर इसम आपल्या पत्नीसोबत सामान घेण्यासाठी आला होता. यावेळी पत्नी सामानाची यादी पाहत असताना पतीने डिलिव्हरी बॉयला त्याचे नाव विचारले. मात्र नाव ऐकल्यानंतर हा मुलगा मुस्लिम असल्याचे कळल्यानंतर त्यांने सामान घेण्यास नकार दिला. दरम्यान डिलिव्हरी बॉय आणि सदर इसमामध्ये बाचाबाचीही झाली. डिलिव्हरी बॉयनं सर्व संवाद आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केला. वाचा-कोरोनामुळे जेलमधून सुटले तोच ठरला शेवटचा दिवस, गावात येताच दोन्ही भावांचा मर्डर डिलिव्हरी बॉयनं हा प्रसंग आपल्या घरच्यांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रारकरण्यास सांगितले. डिलिव्हरी बॉयच्या घरच्यांनी याबाबत सांगितले की, "लोकांना घरपोच सामान मिळावे म्हणून या मुलगा दिवस-रात्र काम करतो. आम्हाला सतत त्याची चिंता असते. त्यानं आतापर्यंत अनेक घरांमध्ये सामान पोहचवले आहे, पण असा दुजाभाव कधी मिळाला नाही". दरम्यान पोलिसांनी अटक केलेल्या इसमावर कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा-कोरोनापासून वाचण्यासाठी लॉकडाऊन; घरात बसल्या बसल्या या आजाराने घातला विळखा संपादन-प्रियांका गावडे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या