• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • आतेभावासोबत प्रेमसंबंध.. चहाच्या कपवर लागलेल्या 'लिपस्टिक'मुळे उलगडलं हत्येचं गूढ

आतेभावासोबत प्रेमसंबंध.. चहाच्या कपवर लागलेल्या 'लिपस्टिक'मुळे उलगडलं हत्येचं गूढ

आरोपी कितीही चतुर असला तरी तो गुन्हा केल्यानंतर काही ना काही पुरावा सोडतोच, हे मीरा भाईंदरमधील हत्याकांडातून पुन्हा एकदा समोर आले आहे. चहाच्या कपवर लागलेल्या लिपस्टिकमुळे हत्येचं गूढ उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे.

 • Share this:
  मुंबई, 8 ऑगस्ट- आरोपी कितीही चतुर असला तरी तो गुन्हा केल्यानंतर काही ना काही पुरावा सोडतोच, हे मीरा भाईंदरमधील हत्याकांडातून पुन्हा एकदा समोर आले आहे. चहाच्या कपवर लागलेल्या लिपस्टिकमुळे हत्येचं गूढ उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतेने पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रमोद पाटणकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. दिप्ती पाटणकर आणि समाधान पाषाणकर अशी आरोपींची नावे आहेत. आतेभावासोबत प्रेमसंबंध.. दिप्तीचे तिचा आतेभाऊ समाधान पाषाणकर याच्याशी प्रेमसंबध होते. मात्र, घरच्यांनी तिचा विवाद प्रमोद यांच्याशी लावून दिला. दिप्ती आणि समाधानच्या प्रेमसंबंधाबाबत पती प्रमोदला कुणकुण लागली होती. नंतर प्रमोद हा दिप्तीला सारखा टॉर्चर करत होता. प्रमोदचा काटा काढण्यासाठी दिप्तीने प्रियकराची मदत घेतली. 15 जुलै 2019 ला प्रमोदला ठार मारण्याचा दोघांनी प्लान आखला. दिप्तीने आपल्या मुलीला 14 जुलैला रात्रीच आई-वडिलांकडे सोडले. 15 जुलैला सकाळी तिने प्रमोदला चहा बनवून दिला. चहात तिने आधीच 20 झोपेच्या गोळ्या घातल्या होत्या. चहा प्यायल्यानंतर काहीवेळाने प्रमोदला गुंगी आली. तो झोपी गेला. नंतर दिप्तीने समाधानला बोलावून घेतले. ठरल्याप्रमाणे दिप्तीने समाधानच्या मदतीने प्रमोदचा गळा आवळून त्याची निर्घृण हत्या केली. चहाच्या कपवर लागलेल्या 'लिपस्टिक'मुळे उलगडलं गूढ.. एक अनोखळी महिला घरी आली होती. तिने प्रमोदसोबत चहा प्यायला आणि तिनेच प्रमोदची हत्या करुन चोरी केल्याचा बनाव दिप्तीने केला. यासाठी समाधानने तिला मदत केली. समाधान याने त्याच्या ओठाला लिपस्टिक लावली आणि ओठ चहाच्या कपाला लावले. तसेच बेडरुममधील कपाटातील सामान अस्ताव्यस्त करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, चहाच्या कपवर लागलेल्या लिपस्टिकचा आधार घेत पोलिसांनी आरोपी दिप्ती आणि समाधानच्या मुसक्या आवळल्या. VIDEO:ट्रॅफिक सिग्नल तोडून महिलेचाच राडा; पोलिसाच्या अंगावर घातली गाडी, मीडियाचा कॅमेराही तोडला
  Published by:Sandip Parolekar
  First published: