मीराभाईंदर पालिकेवर भाजपचा झेंडा, पण नगरसेवकांनी केलं शिवसेनेला मतदान

मीराभाईंदर पालिकेवर भाजपचा झेंडा, पण नगरसेवकांनी केलं शिवसेनेला मतदान

शिवसेनेच्या बाजूने भाजपच्या ५ नगरसेवकांनी उघडपणे मतदान केलं आहे.

  • Share this:

विजय देसाई, प्रतिनिधी

मीरा भाईंदर, 26 फेब्रुवारी :  मीरा भाईंदर महापालिका महापौरपदी निवडणुकीत भाजपने आपला गड कायम राखला आहे.  भाजपच्या ज्योत्स्ना हसनाळे आणि उपमहापौर पदी हसमुख गेहलोत यांचा विजय झाला आहे. विशेष म्हणजे, भाजपच्याच नगरसेवकांनी सेनेला मतदान केलं होतं.

या निवडणुकीत भाजपाच्या ज्योत्स्ना हसनाळे यानी त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले शिवसेना-काँग्रेस महाविकास आघाडीच्या अनंत शिर्के यांचा पराभव केला असून ज्योत्स्ना हसनाळे यांना 55 मतं तर शिवसेनेच्या अनंत शिर्के यांना 36 मतं मिळाली आहेत. उपमहापौर पदासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार मर्लिन डीसा यांना एकूण  35 मतं तर भाजपाचे उमेदवार हसमुख गेहलोत यांना एकूण 56 मतं मिळाले आहेत.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महापौरपदाचा अडीच वर्षाचा  कार्यकाळ २७  फेब्रुवारी रोजी समाप्त होत आहे. त्यापूर्वी अडीच वर्षांसाठी नवीन महापौर निर्मितीची प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचं आहे. महानगरपालिकेचे महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव होते तर उपमहापौर हे सामान्य प्रवर्गासाठी या निवडणुकीत एकूण ९५ नगरसेवका पैकी 91 नगरसेवकांनी  सहभाग नोंदवला आणि आपला मतदानाचा हक्क बजावला.

शिवसेनेच्या बाजूने भाजपच्या ५ नगरसेवकांनी उघडपणे मतदान केलं आहे. भाजपने आमच्या नगरसेवकांचे अपहरण केल्याचा आरोप सेना आणि कॉंग्रेसने केला आहे.

भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मतदान केल्यानं भाजपचे महापौर आणि उपमहापौर निवडून आले असून त्याचं अभिनंदन माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं आहे. मात्र, नरेंद्र मेहता आणि नीला सोन्स प्रकरणावर बोलण टाळलं.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अपक्ष आमदार निवडून येऊन देखील भाजपला पाठिंबा देणाऱ्या आणि सध्या भाजपवर नाराजगी व्यक्त करणाऱ्या आमदार गीता जैन  यांनी मीरा भाईंदर महापौर निवडणुकीत मात्र शिवसेनेला मतदान केलं.

First published: February 26, 2020, 5:59 PM IST

ताज्या बातम्या