शिवसेनेलाच मतदान झाल्याची खात्री करा, ईव्हीएमबाबत उद्धव ठाकरेही साशंक

"भाजपकडे सत्ता स्थापन करायला पैसे आहेत, मतं खरेदी करायला पैसे आहेत पण गोरखपूरच्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन विकत घ्यायला पैसे नव्हते का? "

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 17, 2017 10:06 PM IST

शिवसेनेलाच मतदान झाल्याची खात्री करा, ईव्हीएमबाबत उद्धव ठाकरेही साशंक

17 आॅगस्ट : मतदान करताना शिवसेनेलाच मतदान झालंय का याची खात्री करा असं आवाहन करताना ईव्हीएमबाबत अशी साशंकता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. तसंच काही लोकं निवडणुकीच्या तोंडावर बाजारबुणग्यांची भरती करतात आणि निवडणुका लढतात असा टोलाही त्यांनी यावेळी भाजपला लगावला.

मीरा भाईंदर महापालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी उद्धव ठाकरे आज भाईंदरमध्ये आले होते. यावेळी झालेल्या प्रचारसभेत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. आपण फोडाफोडी केली नाही. सगळे आपल्याकडे स्वत: आले. लाट आली की बाजारबुणगे इकडे तिकडे जातात. जनता पक्षाच्या लाटेत पण शिवसेना टिकली वाढली अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

तसंच मुंबई विद्यापीठाच्या निकाल घोळावरही त्यांनी टीका केली. विद्यापीठाचे निकाल कधी लागणार हे माहीत नाही. मुख्यमंत्री फक्त निवडणूक जिंकण्यासाठी रस्त्यावर उतरतात.  मुख्यमंत्री बाकी काही अंगाला लावून घेत नाहीत. भाजपने नोटबंदी करून काळा पैसा घालवला ना? मग आता निवडणुकीत पैसा वाटला जातोय तो कुठला? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

तसंच भाजपकडे सत्ता स्थापन करायला पैसे आहेत, मतं खरेदी करायला पैसे आहेत पण गोरखपूरच्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन विकत घ्यायला पैसे नव्हते का? गोरखपूरमध्ये लहान मुलं दगावली त्याला जबाबदार कोण? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला.

अमित शहांवर टीका

Loading...

भाजपचे नेते म्हणतात गोरखपूरची घटना छोटी आहे. एवढ्या मोठ्या देशात अशा घटना होत राहतात. हे ऐकून भाजपचे सरकार निर्दयी झाल्यासारखे वाटतंय. असंच मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आर आर पाटील बोलले होते. त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. पण आता भाजप सत्तेत आहे त्यामुळे त्यांची भाषा बदलली आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 17, 2017 10:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...