मीरा-भाईंदर पालिकेवर भाजपचा झेंडा

मीरा-भाईंदर पालिकेवर भाजपचा झेंडा

मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपने एकहाती सत्ता राखली आहे. बहुमताचा आकडा पार करत भाजपने 61 जागांवर कब्जा केलाय.

  • Share this:

21 ऑगस्ट : मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपने एकहाती सत्ता राखली आहे.  94 जागांपैकी भाजपने  60 जागा जिंकल्या आहे.  तर शिवसेनेला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेसची चांगलीच दमछाक झाली असून तिसऱ्या स्थानावर फेकली गेली आहे. राष्ट्रवादीला अजून भोपळाही फोडता आला नाही.

मिरा भाईंदर महापालिका निवडणूक कधी नव्हे ती चुरशीची ठरली. खरंतर भाजप आणि सेनेनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. आजपर्यंत मिरा भाईंदर महापालिका निवडणुकीची राज्याच्या राजकारणात हवीतशी दखल घेतली गेली नाही. मात्र, यावेळी या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जातीने लक्ष घातलं. अखेरच्या टप्प्यात सभा घेऊन निवडणूक महत्त्वाची असल्याचं नमूद केलं. पण, मिरा भाईंदरमध्ये जास्त अमराठी आणि अल्पसंख्याक मतदार आहेत. विशेष म्हणजे मतदानाची टक्केवारीही 46 इतकीच होती. त्यामुळे हा मतदार कुणाच्या पारड्यात मत टाकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

मतदारराजाने भाजपला पसंती देत भरभरून मतदान केलं. भाजपने सकाळपासून आघाडी घेतली ती बहुमताचा आकडा पार करत एक हाती सत्ता राखलीये. मागील निवडणुकीत भाजपला 29 जागा मिळाल्या होत्या. यावेळी या जागांमध्ये दुपट्टीने वाढ झालीय.

शिवसेनेच्या जागा वाढल्यात

मागील निवडणुकीत शिवसेनाला 14 जागा मिळाल्या होत्या. यावेळी सत्तेचं स्वप्न जरी भंगलं असलं तरी सेनेच्या जागेत वाढ झालीये.  अतिम निकाल हाती आला असून सेनेच्या वाट्याला 22 जागा मिळाल्या आहेत. मुंबई मोठा भाऊ असलेल्या सेनेला इथं छोट्या भावाची भूमिका साकारावी लागणार आहे.

राष्ट्रवादीला भोपळा

मिरा भाईंदर महापालिकेत राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर होती. राष्ट्रवादीकडे भाजपखालोखाल 27 जागा होत्या. पण यावेळी राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नाही. एकही जागा न मिळाल्यामुळे राष्ट्रवादीची मोठी घसरण झालीये.

काँग्रेसची पीछेहाट

मागील निवडणुकीत काँग्रेसच्या वाट्याला 19 जागा आल्या होत्या. मात्र, यावेळी काँग्रेसच्या 10 जागांची घसरण झालीये. शिवसेनेच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यामुळे काँग्रेसच्या एका जागेवर बिनविरोध जिंकली. अल्पसंख्याक मतांवर मदार असलेल्या काँग्रेसला यावेळी मतदारांनी हात दाखवलाय.

 मिरा भाईंदर पालिकेचा अंतिम निकाल 

भाजप 61

शिवसेना 22

काँग्रेस 10

राष्ट्रवादी 00

अपक्ष 02

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2017 03:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading