21 आॅगस्ट : मीरा-भाईंदर महापालिकेत भाजपने एकहाती सत्ता राखलीये. या घवघवीत यशानंतर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मिरा-भाईंदरकरांनी "लबाडाघरचे आमंत्रण" नाकारले असं म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.
मीरा भाईंदर महापालिकेत भाजपचं 'कमळ' उमललंय. 94 जागेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने आतापर्यंत 57 जागा जिंकत एकहाती सत्ता राखली आहे. शिवसेनेनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या निकालानंतर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सेनेच्या पराभवावर टि्वटकरून मिठ चोळलंय.
मिरा-भाईंदरकरांनी "लबाडाघरचे आमंत्रण" नाकारले. पारदर्शी विकासाची हमी देणाऱ्या भाजपचा दणदणीत विजय करून स्विकारले अशा शेलक्या शब्दात शेलार यांनी सेनेवर टीकास्त्र सोडलं.
तसंच मुंबईत दमछाक, पालघर-कल्याण-डोंबिवलीत अडले. आणि पनवेलमध्ये भोपळा मिळालाय अशी खिल्ली शेलार यांनी उडवलीये. एमएमआरमध्ये पाचव्यांदा मतदारांनी उघडा केला काहींच्या ताकदीचा असली चेहरा असं म्हणत उद्धव ठाकरे यांना शेलारांनी टोला लगावलाय.
तर दुसरीकडे भाजपचे खासदार किरीट सोमय्यांनीही आता तरी बांद्रा सुप्रिमो वास्तविकता स्वीकारणार का, मिरा भाईंदरच्या निकालानंतर किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. आतातरी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचा मान राखणार का ? असा सवाल सोमय्यांनी केलाय.
मिरा-भाईंदरकरांनी "लबाडाघरचे आमंत्रण" नाकारले..पारदर्शी विकासाची हमी देणाऱ्या भाजपचा दणदणीत विजय करून स्विकारले! मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन! !
— ashish shelar (@ShelarAshish) August 21, 2017
मुंबईत दमछाक, पालघर,कल्याण-डोंबिवलीत अडले, पनवेलमधे भोपळा एमएमआरमधे पाचव्यांदा मतदारांनी उघडा केला "काहींच्या" ताकदीचा अस्सली चेहरा!
— ashish shelar (@ShelarAshish) August 21, 2017
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा