मीरा भाईंदर निवडणुकीत सरासरी 46 टक्के मतदान

मीरा भाईंदर निवडणुकीत सरासरी 46 टक्के मतदान

मीरा-भाईंदर महानगरपालिकेसाठी काहिसं संथ गतीने हे मतदान सुरू आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत फक्त 42 टक्के मतदान झाल्याची नोंद झालीय.

  • Share this:

मुंबई, 20 ऑगस्ट :मीरा-भाईंदर महानगरपालिकेसाठी अंदाजे 46 टक्के मतदान झालं. सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे मतदानावर परिणाम झाला. सकाळी दहा वाजेपर्यंत अवघं पाच टक्क्यांपर्यंत मतदान झालं होतं. पावसामुळे मतदारांनी घरीच राहणं पसंत केलं.त्यामुळे मतदानाचा वेग फारसा वाढला नाही. 94 जागांसाठीचं मतदान पार पडलं असून उद्याच निकाल जाहीर होणार आहे.

या निवडणुकीमध्ये एकूण 774 मतदान केंद्र असून त्यापैकी 9 मतदान केंद्र संवेदनशील आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख यांनी त्यांच्या प्रचारसभांचा तोफा धडाडल्या. अनेक दिग्गज नेत्यांनी इथं विजयासाठी जोर लावलाय. त्यामुळे मीरा-भाईंदरवर कुणाची सत्ता येणार यासोबत दिग्गजांची प्रतिष्ठाही पणाला लागलीय. या निवडणुकीत सेना, भाजप स्वतंत्रपणे लढताहेत. तर ठाकुरांनी इतर छोट्या पक्षांची एकत्रित मोट बांधून निवडणूक लढवलीय.

मीरा-भाईंदर मनपा निवडणूक दृष्टीक्षेपात

एकूण लोकसंख्या - 8 लाख 9 हजार 378

मतदार संख्या - 5 लाख 93 हजार 345

एकूण प्रभाग - 24

एकूण जागा - 95 (महिलांसाठी राखीव 48 )

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2017 01:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading