ओळखीची व्यक्तीच ठरला नराधम, अल्पवयीन मुलीचं अपहरण करून बलात्कार

ओळखीची व्यक्तीच ठरला नराधम, अल्पवयीन मुलीचं अपहरण करून बलात्कार

संतापजनक बाब म्हणजे या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा आरोपी प्रकाश बजाज हा पीडितेच्या ओळखीतीलच आहे.

  • Share this:

उल्हासनगर, 5 नोव्हेंबर : क्लासला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरमध्ये घडला आहे. संतापजनक बाब म्हणजे या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा आरोपी प्रकाश बजाज हा पीडितेच्या ओळखीतीलच आहे.

उल्हासनगर कॅम्प नंबर 4 परिसरातून पीडित मुलगी ही क्लासला जात होती. याच दरम्यान तिच्या परिचयाचा प्रकाश बजाज याने तिला गाठले. त्यानंतर तिचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलगी घरी न आल्याने तिच्या वडिलांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार दाखल केली. पोलिसांनी या मुलीचा शोध घेतला त्यावेळी चौकशी दरम्यान तिने हा सगळा प्रकार पोलिसांना सांगितला.

सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांनी सूत्र हलवत नराधम प्रकाश बजाज याला अटक केली आहे. प्रकाश बजाज याच्या विरोधात अपहरण,पोक्सो अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, ओळखीच्या व्यक्तीनेच एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून बलात्कार केल्याने परिसरात मोठा संताप पसरला आहे. ओळखीचा व्यक्तीच जर नराधम ठरत असेल तर विश्वास ठेवायचा तरी कोणावर, असा सवाल उपस्थित होत आहे.

VIDEO : माकडाने केलं मांजराच्या पिल्लाचं अपहरण

First published: November 5, 2018, 10:37 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading