Home /News /mumbai /

Air India फ्लाईट्सचं बुकिंग सुरू करणार का? मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका!

Air India फ्लाईट्सचं बुकिंग सुरू करणार का? मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका!

3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला होता. आता 3 मेनंतरची परिस्थिती लक्षात घेऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

  मुंबई 19 एप्रिल: लॉकडाऊमुळे सगळा देशच ठप्प झालाय. देशभर माणसं अडकून पडली आहेत. प्रत्येकाला प्रतिक्षा आहे ती विमान वाहतूक केव्हा सुरू होईल याची. Air Indiaने यासदंर्भात संकेत दिले होते. लॉकडाऊन संपल्यानंतर म्हणजे 4 मे पासून Air India देशांतर्गत म्हणजेच Domestic फ्लाईट्सचं तर 1 जून पासून आंतरराष्ट्रीय फ्लाईट्सचं बुकिंग सुरू करणार आहे असं म्हटलं जात होतं. मात्र हवाई वाहतूकमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी यावर स्पष्टिकरण दिलं आहे. यासंदर्भात मंत्रालयाने कुठलाही निर्णय अद्याप घेतलेला नाही. लॉकडाऊन संपल्यानंतर यासंदर्भात विचार करून मंत्रालय आपला निर्णय जाहीर करणार आहे. हा निर्णय झाल्यानंतरच त्यासंदर्भात बुकिंग करण्याचा निर्णय घ्या असे निर्देश विमान कंपन्यांना दिले गेले आहेत आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे विमानसेवा सुरू होण्यासाठी सगळ्यांना अजुन प्रतिक्षा करावी लागणार आहे. 23 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यानंतर 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला होता. आता 3 मेनंतरची परिस्थिती लक्षात घेऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. ड्युटीवर हजर होण्यासाठी पोलिसाने 17 दिवसांत चालत कापले 550 किमी अंतर जगातल्या जवळपास सर्वच कंपन्यांनी हवाई वाहतूक बंद केलीय. फक्त अत्यावश्यक सेवेसाठीची विमानेच तेवढी सुरू आहेत. त्यामुळे हवाई कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. असं असलं तरी काही दिलासादायक घटना घडत आहेत. देशातल्या 12 राज्यांमधल्या 22 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांमध्ये एकही नवा रुग्ण आढळला नाही अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

  नरेंद्र मोदी सरकारचा मोठा निर्णय, चीनी कंपन्यांना बसणार दणका

  गेल्या 24 तासांमध्ये 991 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 43 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 14,378वर तर मृत्यूचा आकडा 480वर गेला आहे. यात 4,291 जण हे तबलिगी जमातशी संबंधीत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  Tags: Air india

  पुढील बातम्या