हे खातेवाटप अंतिम नाही, राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान

हे खातेवाटप अंतिम नाही, राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान

नागपुरात 16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेश होत असून आठवडाभर हे अधिवेशन चालणार आहे. त्यानंतर 23 डिसेंबरच्या दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

  • Share this:

मुंबई 12 डिसेंबर : महाविकास आघाडीच्या खातेवाटपावर आता नव्याने चर्चा सुरू झालीय. खातेवाटपावर काही नेते नाराज असल्याचंही बोललं जातंय. गृह खात्यावरून ही नाराजी असल्याचं बोललं जात असतानाच राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी सूचक विधान केलंय. हे खातेवाटप अंतिम नाही. हे तात्पुरतं असून मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यावरच राज्याच्या लोकांना खरं चित्र स्पष्ट होईल असं मत त्यांनी ट्वीटरवर व्यक्त केलंय. नागपुरात 16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेश होत असून आठवडाभर हे अधिवेशन चालणार आहे. त्यानंतर 23 डिसेंबरच्या दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. गृहमंत्रालय हे राष्ट्रवादीने मागितलं होतं. आत्ताच्या खातेपाटपात ते शिवसेनेकडेच आहे. त्यामुळे चर्चेला सुरुवात झालीय.

खातेवाटपानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील नाराज दिसत आहेत. एरव्ही पत्रकारांशी सहज बोलणारे जयंत पाटील यांनी मात्र 'नो कमेंट्स' (No Comments) असे सांगत त्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळले. यावरून वित्त आणि नियोजन खाते मिळालेले जयंत पाटील नाराज असल्याच्या नव्या चर्चेला उधाण आले आहे. जयंत पाटील गृह खात्यासाठी आग्रही होते. पण, हे खाते शिवसेनेने स्वत: कडे ठेवले आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना गृह खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

असं आहे खातेवाटप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे- माहिती जनसंपर्क, सामान्य प्रशासन आणि इतर मंत्र्यांकडे नसलेली सर्व खाती

शिवसेना

एकनाथ शिंदे- गृह, नगरविकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृद व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण

सुभाष देसाई- उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषि, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्ये, राजशिष्टाचार, भूकंप पुनर्वसन, बंदरे आणि खार भूमी विकास

काँग्रेस

बाळासाहेब थोरात - महसूल, उर्जा व अपारंपारिक उर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेक शिक्षण, पशू संवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय

नितीन राऊत- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण

राष्ट्रवादी

जयंत पाटील- वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्यांक विकास

छगन भुजबळ- ग्रामविकास, जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास आणि उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन

Published by: Ajay Kautikwar
First published: December 12, 2019, 10:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading