मुख्यमंत्री आता मंत्र्यांचे प्रगतिपुस्तक तपासणार !

मुख्यमंत्री आता मंत्र्यांचे प्रगतिपुस्तक तपासणार !

मुख्यमंत्र्यांनी आता सर्व मंत्र्यांना स्वतःच्या कामगिरीचा लेखाजोखा सादर करण्याचे आदेश दिलेत.

  • Share this:

मुंबई, 12 सप्टेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्यात 'मोदी स्टाईल' वापरली आहे. मोदींच्या पावलावर पाऊल टाकत त्यांनी आपल्या मंत्र्यांचे प्रगती पुस्तक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी आता सर्व मंत्र्यांना स्वतःच्या कामगिरीचा लेखाजोखा सादर करण्याचे आदेश दिलेत. मंत्रिपदी राहून काय काम केले, किती कल्पक योजना राबवल्या, किती नवीन निर्णय घेतले तसेच ते निर्णय किती लोकपयोगी ठरले, याचा आकडेवारीसह आढावा देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांना दिले आहेत, ही सर्व माहिती सर्व मंत्र्यांनी विहित मुदतीत मुख्यमंत्र्यांकडे सादर करावयाची आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंतरी काही मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराज आहेत, आणि जर अशा लोकांना संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात वगळायचे असेल तर त्यासाठी आपल्या हाती काहीतरी आधार हवा, म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी हे रिपोर्ट कार्डचं अस्त्रं बाहेर काढल्याचं बोललं जातंय. केंद्रातही मंत्रीमंडळ विस्ताराआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अश्याच पद्धतीने मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन काहिंना घरी बसवलंय. त्यामुळे आता राज्यातही मुख्यमंत्र्यांच्या रडारवर नेमकं कोण आहे. हे प्रगस्तिपुस्तकाच्या माध्यमातून आपोआप समोर येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 12, 2017 01:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading