मुंबई, 4 सप्टेंबर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोविड नियमांचे पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्री सातत्याने करत आहेत. मात्र, आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित होत असलेल्या कार्यक्रमातच कोविड प्रतिबंधक नियमांची (Covid norms) पायमल्ली झाल्याचं पहायला मिळालं. मुंबईतील नायर रुग्णालयाचा (Mumbai Nair Hospital) आज शतकपूर्ती सोहळा पार पडला. या कार्यक्रमात स्टेजवर मंत्री, प्रशासकीय अधिकारी आणि इतर नेत्यांची गर्दी पहायला मिळाली. स्टेजवर कुठल्याही प्रकारे सोशल डिस्टन्सिंग (Social distancing norms violation) नसल्याचं यावेळी दिसून आहे.
नायर रुग्णालय शतक महोत्सवी कार्यक्रमला स्टेजवर सोशल डिस्टिंनसिंगचा विसर पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच इतर मंत्र्यासह प्रशासनातील अधिकारी, महापौर मिळून 20 जण एकाच वेळी स्टेजवर उपस्थित होते. नायर हाँस्पिटल प्रशासनालाच कोविड 19 संसर्ग प्रतिबंधक निर्बंधांचा विसर पडल्याचं पहायला मिळालं.
स्टेज वर उपस्थित मान्यवर...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मंत्री आदित्य ठाकरे
मंत्री अस्लम शेख
महापौर किशोरी पेडणेकर
आयुक्त इकबाल सिंग चहल
अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी
आमदार यामिनी जाधव
नायर डिन रमेश भारमल
नगरसेविका संध्या जोशी
सभागृह नेत्या विशाखा राऊत
सभागृह नेते यशवंत जाधव
नगरसेवक गीता गवळी
आरोग्य समिती अध्यक्ष राजुल पटेल
प्रभाग समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर
नगरसेवक रमाकांत रहाटे
सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब
नगरसेवक दत्ता पोंगडे
नगरसेवक स्वप्नील टेमकर
त्या पत्रावरुन वडेट्टीवार संतापले अन् म्हणाले, "पडळकर हा अज्ञानी बालक, उगवलेले नवीन गवत"
नायर रुग्णालयाचा शतकपूर्ती सोहळा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयाचा शतकपूर्ती सोहळा मुंबई सेंट्रल येथे पार पडला. या सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महापौर किशोरी पेडणेकर, मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
जर मंत्री, प्रशासकीय अधिकारीच नियमांकडे दुर्लक्ष करत असतील तर इतर सर्वसामान्यांकडून काय अपेक्षा करायच्या असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai