Home /News /mumbai /

BREAKING : महाविकास आघाडी सरकारच्या आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण

BREAKING : महाविकास आघाडी सरकारच्या आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण

तीन दिवसांपूर्वी वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर आज राज्यमंत्री...

    मुंबई, 29 डिसेंबर : राज्यात कोरोनाची (corona) तिसरी लाट येणार की काय अशी शक्यता आता निर्माण झाली आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे तर ओमायक्रॉनचेही रुग्ण वाढत आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे तर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Prasadrao Tanpure corona positive) यांचा सुद्धा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेत. त्यापाठोपाठ मंत्र्यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. तीन दिवसांपूर्वी वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर आजराज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तनपुरे यांनी ट्वीट करून आपल्या कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. 'आज माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तब्येत व्यवस्थित आहे. या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली काळजी घ्यावी. कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार सुरू करावेत' अशी विनंती तनपुरे यांनी केली आहे. (विवाहित पुरुषांनी आहारात या 5 गोष्टी घ्यायलाच हव्यात; काही दिवसात दिसतील परिणाम) तर दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे.  सुप्रिया सुळे यांच्यासह सदानंद सुळे आणि दोन मुले सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. आज सकाळी सुप्रिया सुळे यांनी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती ट्वीट करून दिली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा होम क्वारंटाइन झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात 3900 रुग्ण तर मुंबईत 2510 वर आकडा! दरम्यान,  राज्यात 3900 कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले आहे. गेल्या 24 तासामध्ये 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 2900  रुग्णांपैकी मुंबईत 2510 रुग्णांची नोंद झाली आहे. तर मुंबई महापालिकेकडून शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची माहिती देण्यात आली आहे. आज एकाच दिवसामध्ये  कोरोनाचे नवे रुग्ण २५१० आढळून आले आहे. सलग दुसऱ्या दिवशीही मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या २ हजार पार आल्यामुळे चिंतेत भर घातली आहे. मंगळवारी सुद्धा मुंबईमध्ये एकाच दिवशी कोरोनाची धक्कादायक आकडेवारी समोर आली. एकाच दिवसात 2172 रुग्ण आढळले होते. 2172 पैकी 1377 रुग्ण एकट्या मुंबईत होते.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या