• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • इंजिनिअरला मारहाण प्रकरणावर जितेंद्र आव्हाडांनी दिली पहिली प्रतिक्रिया

इंजिनिअरला मारहाण प्रकरणावर जितेंद्र आव्हाडांनी दिली पहिली प्रतिक्रिया

' माझ्या विरोधात गेली 3 वर्षे हा अभियंता नाही नाही त्या पोस्ट करतोय हे माझे कार्यकर्ते मला अनेकदा सांगायचे पण मी त्याकडे दुर्लक्ष केले.'

  • Share this:
ठाणे 07 एप्रिल : सोशल मीडियावर विरोधात पोस्ट टाकणाऱ्या एका इंजिनिअरला मारहाण केल्या प्रकरणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले ज्या तरुणाने त्याला माझ्या देखत आणि माझ्या माणसांनी मारहाण केलीये अशी तक्रार केली त्याला मी ओळखत नाही. माझ्या विरोधात गेली 3 वर्षे हा अभियंता नाही नाही त्या पोस्ट करतोय हे माझे कार्यकर्ते मला अनेकदा सांगायचे पण मी त्याकडे दुर्लक्ष केले. मी सतत 24 तास माझ्या मतदार संघात आणि सोलापूर जिल्हयात कामात व्यस्त आहे. अभियंत्याला मारहाण हा प्रकार मला मीडिया मार्फत कळाला असा खुलासाही त्यांनी केला. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकली म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्या संरक्षणासाठी असलेल्या सरकारी पोलिसांनी अभियंत्याला उचलून आणले आणि आव्हाड यांच्या बंगल्यावर आणून त्याला बेदम मारहाण केली. त्यावेळी आव्हाड हे उपस्थित होते आणि त्यांच्यादेखत ही मारहाण केली गेली अशी तक्रार त्या इंजिनिअरने केली होती. त्यावर दिवसभर आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली नव्हती. अखेर त्यांनी उशीर त्यावर खुलासा करत आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिमंडळातून तात्काळ बडतर्फ करावं अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यामुळे कोरोनाचा वाढता संसर्ग असतानाच राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत बेदम मारहाण झाल्याचा आरोप एका तरुणाने केला होता. या मुद्यावरून विरोधकांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका केली आहे. राज्याचे गृहनिर्माण खातं जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आहे.

कोरोनामुळे देशातल्या सर्वात लहान 14 महिन्यांच्या मुलीचा मृत्यू

मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्यात राहणाऱ्या एका सिव्हील इंजीनिअर तरुणाने गंभीर आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे.  सुरक्षारक्षकांनी जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेवून त्यांच्यासमोर अमानुष मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कोरोना : 42 डॉक्टर्स नंतर पिंपरी-चिंचवडच्या ‘त्या’ 50 जणांचेही रिपोर्ट निगेटिव्ह

आव्हाड यांच्यावरील या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून जितेंद्र आव्हाड यांच्या बडतर्फीची मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की,'एखाद्या व्यक्तीला मंत्र्यांच्या सुरक्षारक्षकाने, मंत्र्यांच्या घरी नेऊन, मंत्र्यांच्या उपस्थितीत बेदम मारहाण करणे, ही अतिशय गंभीर घटना आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड याना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करावे.'
Published by:Priyanka Gawde
First published: