Home /News /mumbai /

महाराष्ट्राची लालपरी आजपासून पुन्हा धावणार, एसटी बसने प्रवास करण्यासाठी असतील 'हे' नियम

महाराष्ट्राची लालपरी आजपासून पुन्हा धावणार, एसटी बसने प्रवास करण्यासाठी असतील 'हे' नियम

जिल्हा-अंतर्गत एसटी बससेवा सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.अनिल परब यांनी दिली आहे.

मुंबई, 21 मे : कोरोना महामारीचा फैलाव रोखण्याच्या दृष्टीने राज्यशासनने दिलेल्या निर्देशानुसार रेड झोन व कंटेन्मेंट झोन वगळता राज्यातील इतर विभागामध्ये काही अटीशर्तींच्या अधीन राहून उद्या 22 मे पासून जिल्हा-अंतर्गत एसटी बससेवा सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.अनिल परब यांनी दिली आहे. '23 मार्च पासून गेले दोन महिने मुंबई व उपनगरात अत्यावश्यक सेवा वगळता एसटी बस सेवा संपूर्ण महाराष्ट्रात बंद आहे. परंतु लॉकडाऊनच्या चौथ्या कालखंडामध्ये राज्यशासनाने रेड झोन व कंटेंनमेंट झोन वगळता काही अटीशर्तींच्या अधीन राहून एसटी महामंडळाला केवळ जिल्ह्या-अंतर्गत (जिल्ह्याच्या सीमेपर्यंतच) एसटी बस सेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील निवडक मार्गावर उद्यापासून एसटी बस सेवा सुरु होत आहे. अर्थात, त्यासाठी खालील नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. 1. जिल्हा-अंतर्गत सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत ही बस सेवा सुरू राहील. 2. प्रवासासाठी द्यावयाच्या सर्व बसेस योग्य सॅनिटायझरचा वापर करून निर्जंतुक केलेल्या असतील. 3. सोशल डिस्टंसिंगचा वापर करून बसच्या एकूण क्षमतेच्या केवळ 50 % प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा असेल. 4. जेष्ठ नागरिक व 10 वर्षाखालील लहान मुलांना बस प्रवासाची परवानगी असणार नाही. (अत्यावश्यक वैद्यकीय कारण वगळून ) 5. प्रत्येक प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने प्रवास सुरु करताना सॅनिटायझरने आपले हात निर्जंतुक करणे गरजेचे आहे. 6. प्रवासामध्ये प्रत्येक प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे. वरील अटी व शर्तींचे काटेकोरपाने पालन करून सर्वसामान्य प्रवाशांनी कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटी महामंडळास सहकार्य करावे असे आवाहन मंत्री, अ‍ॅड. अनिल परब यांनी केले आहे. संपादन - अक्षय शितोळे
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Coronavirus, Lockdown, St bus

पुढील बातम्या