Home /News /mumbai /

CIDCO Lottery : मुंबईत स्वत:च्या घरांचं स्वप्न बघणाऱ्यांसाठी खुशखबर, सिडकोची लॉटरी जाहीर

CIDCO Lottery : मुंबईत स्वत:च्या घरांचं स्वप्न बघणाऱ्यांसाठी खुशखबर, सिडकोची लॉटरी जाहीर

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या प्रजासत्ताक दिनाचं अवचित्त साधत एक गोड बातमी दिली आहे. नवी मुंबईत सिडकोच्यावतीने 5730 घरांची लॉटरी जाहीर झाली आहे.

    ठाणे, 26 जानेवारी : मुंबई (Mumbai), उपनगर (Mumbai Suburb), ठाणे (Thane) किंवा नवी मुंबईत (New Mumbai) स्वत:चं आपल्या हक्काचं एक घर व्हावं, असं स्वप्न बघणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आजच्या प्रजासत्ताक दिनाचं (Republic Day) अवचित्त साधत एक गोड बातमी दिली आहे. नवी मुंबईत सिडकोच्यावतीने 5730 घरांची लॉटरी (CIDCO Lottery) जाहीर झाली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने सिडकोने ही गृहनिर्माण योजना सर्वसामान्यांना भेट म्हणून दिली आहे. नवी मुंबई येथील तळोजा (Taloja) येथे ही 5730 घरे उभारली जाणार आहेत. सिडकोनं तळोजा नोडसाठी लॉटरी काढली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान आवास योजनेच्या (PM Awas Yojna) लाभार्थींनादेखील याचा फायदा होणार आहे. एकूण घरांपैकी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 1524 घर उपलब्ध असतील तर उर्वरित 4206 सर साधारण प्रवर्गासाठी उपलब्ध होणार आहेत. या लॉटरीला आजपासून ते 24 फेब्रुवारीपर्यंत अर्ज नोंदणी करता येईल. जास्त नागरिकांनी या लॉटरीचा लाभ घ्यावा, एकनाथ शिंदेंचं आवाहन 73 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सिडकोच्या वतीने 5730 घरांच्या सोडतीला सुरुवात करण्यात आली आहे. सर्वसामान्य माणसाचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही विशेष सोडत जाहीर करण्यात आली आहे. आजपासून फॉर्म भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरु झाली आहे. पुढील महिनाभर ही प्रक्रिया सुरु राहणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या सोडतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. (Neha ने शेअर केला BIKINI लुक! रामचरणसोबत लग्नाच्या चर्चेने वेधलं होतं लक्ष) एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले? "प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोच्या माध्यमातून 5730 घरांच्या लॉटरीची ऑनलाईन प्रक्रिया सुरु होतेय. सर्वसामान्य लोकांना स्वस्त दरात आणि परवडेल अशा दरात चांगल्या दर्जाचं घर मिळालं पाहिजे. प्रत्येक नागरिकाचं एक स्वप्न असतं. ते पूर्ण करण्यासाठी 5730 घरांची लॉटरीची प्रक्रिया सुरु झाली आहे. ही प्रक्रिया जवळपास एक महिनाभर सुरु राहणार आहे. यामध्ये सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा. सिडकोने आतापर्यंत ज्या योजना केल्या आहेत त्या अतिशय लोकप्रिय ठरलेल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचं चांगलं स्वत:चं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होईल", अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या