मुंबई 10 नोव्हेंबर: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे ((Dhananjay Munde)) यांना मंगळवारी मुंबईतल्या लिलावती हॉस्पिटलमध्ये (Lilavati Hospital Mumbai) दाखल करण्यात आलं. पोटाचा त्रास होत असल्याने त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. धनंजय मुंडे यांनीच स्वत: Twitte करून याची माहिती दिली आहे. धनंजय मुंडे यांनी जून महिन्यात कोरोनावर मात केली होती. त्यानंतर त्यांनी पूर्वीसारखेच कामही सुरू केलं होतं.
आपल्या प्रकृती विषयी माहिती देताना धनंजय मुंडे म्हणाले, तीव्र पोटदुखीमुळे मागील काही दिवसांपासून मी त्रस्त आहे. त्यामुळे उपचारासाठी आज मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे. प्रकृती स्थिर असून उपचार घेऊन मी लवकरच पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल.
डॉक्टरांच्या चाचण्यांचे रिपोर्ट्स आल्यानंतरच पोटदुखीचं कारण कळणार आहे. कोरोनानंतर उद्भवणारा हा त्रास आहे का त्याचंही डॉक्टर निदान करणार आहेत.
धनजंय मुंडे यांना श्वास घेताना त्रास होत असल्याने त्यांना 12 जून रोजी तातडीने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मुंडे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर 11 दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. नंतर रिपोर्ट्स निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.
तीव्र पोटदुखीमुळे मागील काही दिवसांपासून मी त्रस्त आहे. त्यामुळे उपचारासाठी आज मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे. प्रकृती स्थिर असून उपचार घेऊन मी लवकरच पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल.
धनंजय मुंडे यांना त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहे. तुम्ही लवकरच बरे होऊन पुन्हा कामावर परत याल अशा सदिच्छाही कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.