मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

ठाकरे बंधूंमध्ये जुंपली; खड्ड्यांवरुन टीका करणाऱ्या Amit Thackeray यांना मंत्री Aaditya Thackeray यांचं प्रत्युत्तर

ठाकरे बंधूंमध्ये जुंपली; खड्ड्यांवरुन टीका करणाऱ्या Amit Thackeray यांना मंत्री Aaditya Thackeray यांचं प्रत्युत्तर

Aaditya Thackeray on Amit Thackeray: डोंबिवली दौऱ्यावर असलेल्या अमित ठाकरेंनी खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता आदित्य ठाकरेंनी त्याला प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबई, 2 ऑक्टोबर : महानगरपालिकांच्या निवडणुका जवळ (Municipal Corporation Elections) आलेल्या आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपली तयारी सुरू केली आहे. याच दरम्यान राजकीय नेत्यांकडून विविध मुद्द्यांवरुन आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. तसेच राजकीय नेत्यांचे दौरे सुद्धा सुरू झाले आहेत. डोंबिवली दौऱ्यावर असलेले मनसेचे युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन थेट शिवसेनेवर निशाणा साधला. अमित ठाकरे यांनी केलेल्या टीकेला आता मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

"आपल्या सगळ्यांना मुंबईवर विश्वास आहे, बीएमसीवर विश्वास आहे. आपण जे काम करतो ते काही एका रात्रीत होणार नाही... ते काम आपल्याला दिसायला लागतं करावा लागतं" असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी अमित ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले होते अमित ठाकरे?

अमित ठाकरे डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहे. शहराची अवस्था पाहून शिवसेनेकडून अपेक्षा ठेवून काहीच मिळणार नाही, अशी टीका अमित ठाकरे यांनी केली. 'लोकांची कामं केली पाहिजे, या दोन्ही शहरांची अवस्था बकाल झाली आहे. शिवेसेनेकडून अपेक्षा ठेवून काही मिळणार नाही. या पक्षाकडे आता इच्छाशक्ती नाही, अशी टीकाही अमित ठाकरे यांनी केली.

अमित ठाकरे यांनी खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन टीका करताना म्हटलं, रस्ते असे बनतातच कसे ज्याला खड्डे पडतात. आम्ही नुसते बोलत नाही करून दाखवले, मुंबईकरांना खड्डे मुक्त रस्ते हवे असतील तर सत्ता बदल हा एकमेव मार्ग आहे. नाशिकमध्ये खड्डे शोधून सापडत नाही. मी आज एकदिवस वेळ वाचावा म्हणून लोकलने जात आहे. पण ज्यांना रोज येजा करावी लागते त्यांचे फ्रस्ट्रेशन काय असेल? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

खड्ड्यांवरुन अमित ठाकरेंचा संताप

कालच अमित ठाकरे यांनी सोशल मीडियात पोस्ट करुन खड्ड्यांवरुन संताप व्यक्त केला होता. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं होतं की, रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे होणारे ट्रॅफिक जाम, अपघात, वाया जाणारे इंधन या गोष्टींमुळे अगदी सर्वांचंच कंबरडं मोडलंय. पण सत्ताधारी राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या भ्रष्टाचारी आघाडीला त्याच्याशी काही देणंघेणं नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून खड्डेविरोधी आंदोलनं करतोय. खड्डयांबाबत उच्च न्यायालयातही वारंवार खोटं बोलणाऱ्या या भ्रष्टाचाऱ्यांना आता जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होऊ शकेल.

First published:

Tags: Aaditya thackeray, MNS, Raj Thackeray, Shiv sena