मीनाक्षी थापा हत्या प्रकरण : दोषींना सुनावली जन्मठेपेची शिक्षा

मीनाक्षी थापा हत्या प्रकरण : दोषींना सुनावली जन्मठेपेची शिक्षा

अभिनेत्री मीनाक्षी थापा हत्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने अमित जयस्वाल आणि प्रिती सुरीन या दोघांना तिहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

  • Share this:

मुंबई, 11 मे : अभिनेत्री मीनाक्षी थापा हत्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने अमित जयस्वाल आणि प्रिती सुरीन या दोघांना तिहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दोनच दिवसांपूर्वी न्यायालयाने या दोघांना दोषी ठरवले होते. हिंदी सिनेसृष्टीमध्ये काम करण्यासाठी नेपाळहून आलेल्या या उदयोन्मुख अभिनेत्रीची २०१२ मध्ये हत्या करण्यात आली होती.

मीनाक्षी थापा ही नेपाळी अभिनेत्री होती. भोजपुरी आणि हिंदी सिनेमात काम देतो असे सांगून अमित जयस्वाल आणि त्याची गर्लफ्रेंड प्रिती सुरीन या दोघांनीही तिची फसवणूक केली. तिला मुंबईहून गोरखपूरला आणण्यात आले. त्यानंतर मीनाक्षी थापाच्या वडिलांकडे १५ लाखांची खंडणी मागण्यात आली. मात्र मीनाक्षी थापाचे वडील फक्त ६० हजार रुपये जमवू शकले.पैशांची व्यवस्था न झाल्याने अमितने मिनाक्षी थापाचे शीर कापून ते चालत्या बसमधून फेकून दिले तर धड एका पाण्याच्या टाकीत फेकले होते.

२०१२मध्ये अमित आणि प्रीतीने पैशांसाठी मीनाक्षीची हत्या केली. तिने मधुर भंडारकरच्या ‘हीरोइन’ या चित्रपटात छोटी भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या सेटवरच मीनाक्षीची अमित व प्रीतीशी ओळख झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 11, 2018 02:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading