संभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली परवानगी

संभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली परवानगी

संभाजी भिडे हे वादग्रस्त आहेत, आणि चिथावणीखोर भाषण करतात, असा आक्षेप नोंदवण्यात आला.

  • Share this:

मुंबई, 15 डिसेंबर : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या मुंबईतील कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. दलित पँथरने संभाजी भिडे यांच्या 16 डिसेंबरला होणाऱ्या कार्यक्रमाला विरोध दर्शवला होता. त्या पार्श्वभूमीवर ही परवानगी नाकारण्यात आली आहे.

संभाजी भिडे यांचा लालबाग आणि विले पार्ले इथं कार्यक्रम होणार होता. पण संभाजी भिडे हे वादग्रस्त आहेत, आणि चिथावणीखोर भाषण करतात, असा आक्षेप नोंदवण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी भिडेंच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे.

कोण आहेत संभाजी भिडे?

आंब्याबाबतच्या विधानाची चर्चा

एक विशिष्ट आंबा खाल्ला की माणसाची पौरूष शक्ती वाढते आणि त्यामुळे पुत्रप्ताप्ती होते, असं विधान संभाजी भिडे यांनी केलं होतं. गरज पडली तर ही कोर्टात पराव्यानिशी सिद्ध करेन असं आव्हानही त्यांनी विरोधकांना दिलं. तसंच तो विशिष्ट आंबा खाल्ल्याने माणसी सेक्स पॉवर वाढते. या आंब्यावर ऑस्ट्रेलियात संशोधन झालं आहे. त्यात या आंब्यात ही शक्ती असल्याचं सिद्ध झालं आहे. भारतातही अनेकांनी सशोधन केलं असून त्यातही ती गोष्ट सिद्ध झाली आहे. त्यामुळे हे योग्य पद्धतीने समजून घेतलं पाहिजे असंही भिडे म्हणाले होते.

भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी आरोप

भीमा-कोरेगाव इथं झालेल्या जातीय हिंसाचारप्रकरणात संभाजी भिडे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. भिडे यांनी चिथावणी देऊन दंगल भडकावण्याचा प्रयत्न केला, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला होता.

VIDEO : 'जिजामाता या शिवरायांच्या पत्नी', शिक्षण खात्याच्या कारभाराने संताप

First published: December 15, 2018, 9:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading