कुंभमेळ्यातील गर्दीवरून MIM खासदार इम्तियाज जलील यांची मोदींवर टीका, म्हणाले...

कुंभमेळ्यातील गर्दीवरून MIM खासदार इम्तियाज जलील यांची मोदींवर टीका, म्हणाले...

हरिद्वारमधील कुंभमेळ्यातीस गर्दीवरून स्थानिक राज्य सरकारसह केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठत आहे. एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनीही मंगळवारी ट्विट करत यावरून टोमणा मारलाय.

  • Share this:

मुंबई, 13 एप्रिल : देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे अनेक राज्यांनी कठोर निर्बंध लावले आहेत. काही राज्यांमध्ये तर ठराविक ठिकाणी लॉकडाऊनही जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रातही लॉकडाऊन (Maharshtra Lockdown) सुरू होण्याच्या मार्गावर आहे. असं असताना पाच राज्यातील निवडणुका आणि हरिद्वारमधील कुंभमेळ्याच्या गर्दीवरून (Crowd in Kumbhmela) स्थानिक राज्य सरकारसह केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठत आहे. एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनीही मंगळवारी ट्विट करत यावरून टोमणा मारलाय. (MIM MP Imtiaz Jaleel critisized PM Modi)

(वाचा -"सेलिब्रेटींना सुद्धा कोरोनाचा धसका; कमी लक्षण असतानाही होतात रुग्णालयात दाखल" )

ट्विटरवरील एका ट्विटला रिव्टिवट करताना इम्तियाज जलील यांनी नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर भाष्य करणारी टीका केलीय. या ट्विटमध्ये कुंभमेळ्यातील गर्दीचा व्हिडिओ एका गाण्याला जोडून पोस्ट करण्यात आला आहे. या गर्दीच्या मुद्द्यावरूनच इम्तियाज जलील यांनी नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. इम्तियाज जलील यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, 'वो करे तो लीला.. हम करे तो.. जुर्म! वाह मोदीजी वाह!! असं ट्विट करत मोदींच्या भूमिकेवरच जलील यांनी संशय व्यक्त केला आहे.

(वाचा -नाशिकचं Remdesivir मालेगावकरांना, भुसेंच्या रुद्रावतारानंतर नाशिककरांमध्ये संताप )

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या कुंभ मेळ्यावरून केंद्रासह उत्तराखंड सरकारवरही मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. कुंभमेळ्यात येणाऱ्या गर्दीमुळे कोरोना पसरत नाही का? या प्रश्नाचा भडीमार सध्या वारंवार केला जात आहे. तसंच या धार्मिक सोहळ्याची तुलना भूतकाळातील काही वाद झालेल्या धार्मिक सोहळ्यांबरोबर केली जात आहे. त्यामुळं जलील यांनी ही टीका केलीय.

दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी मात्र सर्व आरोपांचं खंडन केलं आहे. कुंभमेळ्याचं आयोजन अत्यंत नियोजनबद्ध रित्या केले जात आहे. त्याची कोविडच्या सर्व गाईडलाईन पाळून सोहळे होत आहेत. सर्व साधुंची व्यवस्था केली असून त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतल्याचंही रावत यांनी सांगितलं आहे. कोरोनाचा संसर्ग यामाध्यमातून होणार नाही, याची काळजी घेतली जात असल्याचं रावत यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.

Published by: News18 Desk
First published: April 13, 2021, 10:23 PM IST
Tags:

ताज्या बातम्या