लढवय्या नेता हरपला, गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांचं निधन

लढवय्या नेता हरपला, गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांचं निधन

दत्ता इस्वलकर यांनी गिरणी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला. मुंबईत अनेक आंदोलनं केली.

  • Share this:

मुंबई, 07 एप्रिल : गिरणी कामगारांच्या (Mill Workers ) हक्काच्या घरांसाठी अखेरच्या क्षणापर्यंत लढा देणारे गिरणी कामगार संघर्ष समितीचे नेते दत्ता इस्वलकर (Datta Iswalkar ) यांचं निधन झालं आहे. ते 72 वर्षांचे होते. मुंबईतील जे जे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते, उपचारादरम्यान आज संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

दत्ता इस्वलकर यांची मंगळवारी तब्येत बिघडली होती. त्यामुळे त्यांना तातडीने जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू झाले होते. मात्र, आज संध्याकाळी 5.30 वाजेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  उद्या सकाळी वरळी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.

मुस्लीमांसंदर्भातील वक्तव्य करणं भोवलं; ममता बॅनर्जींविरोधात ECची नोटीस

दत्ता इस्वलकर यांनी गिरणी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला. मुंबईत अनेक आंदोलनं  केली. संपूर्ण आयुष्य दत्ता इस्वलकर यांनी गिरणी कामगारांसाठी खर्ची घातले. अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा केला होता. मागील वर्षी महाविकास आघाडी सरकारकडून गिरणी कामगारांसाठी म्हाडाच्या घरांची सोडत काढण्यात आली. या सोडतीचे उदघाटन हे दत्ता इस्वलकर यांच्या हस्ते पार पडले होते.

IPL 2021: चेन्नई सुपरकिंग्स प्लेऑफ गाठणार नाही, या प्लेअर्सचा दावा

कामगारांच्या हक्कासाठी लढणाऱ्या दत्ता इस्वलकर यांच्या निधनामुळे कामगारांवर दुखाचे डोंगर कोसळले आहे. लढवय्या नेता हरपला अशी भावना व्यक्त होत आहे.

Published by: sachin Salve
First published: April 7, 2021, 10:19 PM IST
Tags:

ताज्या बातम्या