जेव्हा उद्धव ठाकरेंपेक्षा मिलिंद नार्वेकर मोठे होतात...

जेव्हा उद्धव ठाकरेंपेक्षा मिलिंद नार्वेकर मोठे होतात...

  • Share this:

18 मे : शिवसेनेत उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक  मिलिंद नार्वेकर यांचं प्रस्थ भलतच मोठं झाल्याचं दिसतंय. कारण आज (गुरूवारी) एका दैनिकात शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या जाहीरातीत मिलिंद नार्वेकरांचा फोटो हा उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा आणि ठसठशीतपणे छापण्यात आलाय. मिलिंद नार्वेकर यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त  ही जाहिरात देण्यात आली आहे. फक्त उद्धव ठाकरेच नाही तर बाळासाहेबांचा छापलेला फोटोही नार्वेकरांच्या फोटोपेक्षा लहान आहे. युवा सेनेची जबाबदारी सांभाळणाऱ्या आदित्य ठाकरेंचा फोटो तर बळजबरीनं मधात घुसडलाय की काय अशी शंका यावी इतका लहान आहे. नार्वेकरांचा फोटो ठळक असणं समजू शकतं पण तो सेनेच्या संस्थापकांपेक्षाही मोठा असणं विचार करायला लावणारं आहे. बरं यात एकनाथ शिंदेंनी जाहीरात दिल्यामुळे असे फोटो छापून ते काय दाखवू पहातात याचीही चर्चा आहे.

कोण आहेत मिलिंद नार्वेकर?

आश्चर्याची गोष्ट म्हणजे शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक नेत्याने मिलिंद नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. मात्र, तरीही मिलिंद नार्वेकर इतके वर्ष शिवसेनेत आपलं स्थान टिकवून आहेत.

मुळात मिलिंद साधा शिवसैनिक होते. मालाडच्या लिबर्टी गार्डन भागातला गटप्रमुख. 92 महापालिका निवडणुकांआधी त्याच्या एरियातला वॉर्ड विभागला,म्हणून नव्या वॉर्डचं शाखाप्रमुखपद मिळेल या आशेने ते मातोश्रीवर पोहोचले. चुणचुणीत, हुशार, स्मार्ट, बोलण्यात पटाईत असा हा तरूण मुलगा उद्धव ठाकरेंच्या नजरेत भरला. ते स्वत:च तेव्हा शिवसेनेत सक्रिय होत होते. तेव्हा उद्धव ठाकरेंनी मिलिंद यांना फक्त शाखाप्रमुख बनायचंय की आणखी काही जबाबदारी उचलायची तयारी आहे, असा प्रश्न विचारला. त्यावर मिलिंद नार्वेकरांनी तुम्ही सांगाल ते, असं म्हणत उद्धव ठाकरेंचं मन जिंकलं.

आधी मातोश्रीवर पडेल ते काम करायचे आणि त्यानंतर मिलिंद नार्वेकर रितसरपणे उद्धव ठाकरेंचा पीए बनले. अपॉइण्टमेण्ट घेणं, डायरी ठेवणं, फोन घेणं, दौरे आखणं, व्यवस्था करणं अशी उद्धव ठाकरेंची अनेत कामं ते पाहू लागले. उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेची सत्ता आल्यानंतर मिलिंद नार्वेकरही उद्धव ठाकरेंसोबत मोठे होतं गेले.

पण आता वृत्तपत्रात छापण्यात आलेला त्यांचा फोटो पाहता अनेकांच्या नजरेत खटकणारे नार्वेकर उद्धव ठाकरेंपेक्षाही मोठे झालेत की काय, असा प्रश्न विचारला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 18, 2017 10:40 AM IST

ताज्या बातम्या