राज पुरोहित यांचे वक्तव्य निषेधार्ह; मिलिंद देवरा यांचे Tweet

News18 Lokmat | Updated On: Feb 8, 2019 01:47 PM IST

राज पुरोहित यांचे वक्तव्य निषेधार्ह; मिलिंद देवरा यांचे Tweet

मुंबई, 08 फेब्रुवारी: भाजपचे आमदार राज पुरोहीत यांनी प्रियांका गांधी यांच्याबद्दल केलेल्या विधानाबद्दल काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रियांका गांधी यांनी वाड्रा यांना ईडी कार्यालयात घेऊन जाणं म्हणजे अधिकाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप राज पुरोहित दोन दिवसांपूर्वी केला होता. त्यावर देवरा यांनी न्यूज 18 लोकमतची बातमी शेअर करताना ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे.

राज पुरोहित यांनी केलेले विधान आक्षेपार्ह आहे. लोकप्रतिनिधींनी सभ्य बोलावे असे देवरा यांनी म्हटले आहे. 'प्रियांका गांधी यांच्या धर्मावरुन दक्षिण मुंबईचे भाजप आमदार राज पुरोहित यांनी केलेलं वक्तव्य खोटं आणि निंदनीय आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांनी राजकारणासाठी किती खालची पातळी गाठली आहे तेच दिसत आहे.',असे ट्विट देवरा यांनी केले आहे.
Loading...

याआधी अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहिलेल्या पुरोहित यांनी यावेळी प्रियांका गांधी यांच्यावर वक्तव्य केले. भाजपचे ज्येष्ठ नेते राज पुरोहित पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हं आहेत. यावेळेस त्यांनी प्रियंका गांधी आणि वाड्रा यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. प्रियंका गांधी यांनी वाड्रा यांना ईडी कार्यालयात घेऊन जाणे म्हणजे अधिकाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप राज पुरोहित यांनी केला होता. तसेच वाड्रा हे अपशकुनी असल्याचे त्यांनी म्हटले होते.


VIDEO : राज पुरोहित यांचं वादग्रस्त वक्तव्य; प्रियंका गांधींबद्दल केलं हे विधान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 8, 2019 12:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...