मुंबई, 14 फेब्रुवारी : महाआघाडीत मनसेच्या एन्ट्रीला तीव्र विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या मिलिंद देवरा यांनी मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. 'राज ठाकरे शिवसेनेसारखे संधीसाधू नाहीत,' असं वक्तव्य मिलिंद देवरांनी केलं आहे. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते. मनसेचं कौतुक करताना मिलिंद देवरांनी शिवसेनेवर मात्र टीकास्त्र सोडलं आहे.