Home /News /mumbai /

नवी मुंबईतील खाडी किनाऱ्यावर पसरली गुलाबी चादर; शहरात फ्लेमिंगोंचं आगमन, पाहा मनमोहक VIDEO

नवी मुंबईतील खाडी किनाऱ्यावर पसरली गुलाबी चादर; शहरात फ्लेमिंगोंचं आगमन, पाहा मनमोहक VIDEO

राज्यात सध्या उष्णतेचा पारा भरपूर चढलेला असतानाच मुंबईकरांना मात्र 26 एप्रिल रोजी अतिशय सुखावणारं दृश्य पाहायला मिळालं. नवी मुंबईतील खाडीवर मोठ्या प्रमाणात स्थलांतरित फ्लेमिंगो (Migratory Flamingos at Creek in Navi Mumbai), सीगल्स आणि इतर पक्ष्यांचं आगमन झालं आहे..

पुढे वाचा ...
    नवी मुंबई 29 एप्रिल : राज्यात सध्या उष्णतेचा पारा भरपूर चढलेला असतानाच मुंबईकरांना मात्र 26 एप्रिल रोजी अतिशय सुखावणारं दृश्य पाहायला मिळालं. नवी मुंबईतील खाडीवर मोठ्या प्रमाणात स्थलांतरित फ्लेमिंगो (Migratory Flamingos at Creek in Navi Mumbai), सीगल्स आणि इतर पक्ष्यांचं आगमन झालं आहे.. नवी मुंबईतील खाडीतून फिरणाऱ्या फ्लेमिंगोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. दरवर्षी या काळात याठिकाणी पाण्यात फ्लेमिंगोंची झुंबड उडालेली पाहायला मिळते आणि पक्ष्यांच्या गुलाबी सेनेची झलक पाहण्यासाठी पर्यटक, प्रवासी आणि रहिवासी इथे गर्दी करतात. एएनआयने नुकताच फ्लेमिंगोंचा एक मनमोहक व्हिडिओ (Flamingos Video) शेअर केला आहे. यात पक्ष्यांचा एक मोठा कळप पाण्याजवळ बसलेला दिसतो. मुंबईतल्या हॉटेल ताजमहालमधल्या खोलीचं भाडं अवघे 6 रुपये! एका जाहिरातीची गोष्ट व्हिडिओ शेअर करत एएनआयने कॅप्शनमध्ये लिहिलं, “नवी मुंबईतील खाडीवर मोठ्या संख्येनं स्थलांतरित फ्लेमिंगो, सीगल्स आणि इतर पक्षी आलेत.” व्हिडिओमध्ये मोठ्या संख्येने स्थलांतरित पक्षी पाण्यावरून उडताना आणि पाण्यात खेळताना दिसत आहेत. या पक्ष्यांना पाहण्यासाठी लोक रस्त्याच्या कडेला वाहने थांबवून उतरत आहेत. हे दृश्य इतकं मनमोहक आहे की लोक या स्थलांतरित पक्ष्यांना पाहण्याची संधी सोडत नाहीयेत. गेल्या वर्षी एप्रिलमध्येही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थलांतरित पक्षी दाखल झाले होते. आकडेवारीनुसार, गेल्या वेळी या ठिकाणी दीड लाखांहून अधिक फ्लेमिंगो पोहोचले होते. छोटे फ्लेमिंगो गुजरातमधील कच्छ प्रदेश आणि राजस्थानच्या सांभर सरोवरातून येथे पोहोचतात, तर मोठे फ्लेमिंगो इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इस्रायलसारख्या देशांमधून लांबचा प्रवास करून येथे पोहोचतात. एसटी कर्मचाऱ्यांनंतर आता मुंबईत रिक्षा चालक आंदोलनाचं हत्यार उपसणार, कारण.... नागरिकही या पक्षांना पाहाण्यासाठी मोठी गर्दी करतात. मात्र ज्यांना प्रत्यक्षात याठिकाणी जाऊन फ्लेमिंगो पाहाण्याची संधी मिळत नाही, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच खास आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत, हे दृश्य अतिशय सुंदर असल्याचं म्हटलं आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Mumbai, Viral video on social media

    पुढील बातम्या