मुंबई, 25 सप्टेंबर : भिवंडी शहरातील समदनगर येथील एमआयएम शहर अध्यक्ष खालिद गुड्डू यांच्या बंगल्यावर मध्यरात्री छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी स्थानिक पोलिसांना बाहेर ठेवण्यात आले होते. या छाप्यासाठी तब्बल 30 ते 35 पोलिसांच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. इतक्या मोठा गदारोळ होत असल्याचे पाहून येथे मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक जमा झाले होते.
मात्र पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करुन त्यांना पिटाळून लावले. या छाप्यात खालिद गुड्डू यांच्या लहान भावासह सात जणांना स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा छापा खंडणी विरोधी आणि नार्को टेस्टच्या अधिकाऱ्यानी केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत आज सकाळी 9.30 नंतर या प्रकाराचा खुलासा पोलिसांकडून केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
हे ही वाचा-व्हॉट्सअॅप चॅट कारवाईसाठी सक्षम पुरावा होऊ शकत नाही, उज्ज्वल निकम यांचा खुलासाकोण आहे खालिद गुड्डू?
खालिद गुड्डू हे वादग्रस्त व्यक्तिमत्व असून ते अगोदर राष्ट्रवादीमध्ये शहराध्यक्ष होते. त्यानंतर सध्या ते एमआयएम मध्ये शहरराध्यक्ष असून त्यांनी विधानसभा निवडणूकही लढवली होती. त्यासाठी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसीच्या भिवंडीत सभा झाल्या होत्या. त्याचप्रमाणे ते माजी नगरसेवक आहेत. त्याच्यावर विविध गुन्हे दाखल असून काही निकाली निघाले आहेत. 10 वर्षांपूर्वी त्यांच्या भावाला दिल्ली पोलिसांनी अशाच पध्द्तीने अटक केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.