मुंबई, 29 जून : राज्याच्या विधानसभेचं एक दिवसाचं खास अधिवेशन गुरूवारी होणार आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारच्या भवितव्याचा फैसला होईल. मुख्यमंत्र्यांवरील अविश्वास दर्शक ठराव पास करण्यासाठी भाजपानं कंबर कसलीय. महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये चुरशीची लढत आहे. त्यामुळे प्रत्येक मत हे निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना पत्र फोन केला आहे. विधानसभेत मनसेचा 1 आमदार आहे. त्या आमदाराच्या पाठिंब्यासाठी फडणवीस यांनी राज यांना फोन केलाय. गुरूवारी मनसे भाजपाच्या बाजूनं मतदान करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यपालांची भेट घेतली. सरकार अल्पमतात असल्याने निर्णयात हस्तक्षेप करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यपालांकडे करण्यात आली होती.राज्यपालांना इमेलद्वारे आणि प्रत्यक्ष भाजपकडून पत्र देण्यात आले. या पत्रात राज्याच्या आताच्या परिस्थितीचा उल्लेख केला आहे. 'शिवसेनेचे 39 आमदार बाहेर आहेत. त्यांना बहुमत सिद्ध करायला सांगावं, असं विनंती करणारं पत्र राज्यपालांना देण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा उल्लेख केला आहे. यावर राज्यपाल उचित निर्णय घेतील. अशी आम्हाला अपेक्षा आहे,' असे मत भाजपाने व्यक्त केले होते. भाजपाच्या पत्रानंतर काही तासांमध्ये राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गट उद्या (गुरूवार) मुंबईत येणार आहे. त्यावेळी त्यांच्या स्वागताची भाजपाने जोरदार तयारी केली आहे. उद्या होणाऱ्या अधिवेशनासाठी सज्ज रहा अशी सूचना भाजपा कार्यकर्त्यांना पक्षश्रेष्ठींनी दिली आहे. त्याचबरोबर सकाळी विमानतळ परिसरात उपस्थित राहण्याचे आदेश देखील पक्षानं दिले आहेत.
गुवाहाटी ते विधानभवन कसा होणार बंडखोरांचा प्रवास? वाचा Inside Story
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी आज सकाळीच महाविकास आघाडीला पत्र पाठवले आहे. त्यामुळे उद्या गुरुवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. एवढ्या कमी वेळेत तयारी कशी पूर्ण होणार अशी चर्चा रंगली होती. पण, विधानभवनाने तयारी पूर्ण केली आहे. तर भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने आमदारांना हजर राहण्याचे आदेश दिले आहे. तर बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांचा गट गुवाहाटीवरून निघाला आहे. आधी गोव्या मुक्कामी थांबणार आहे. त्यानंतर उद्या मुंबईमध्ये दाखल होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.