Home /News /mumbai /

शिंदे सरकारचं भवितव्य रविवारी होणार निश्चित, Floor Test पूर्वीच निर्णायक परीक्षा

शिंदे सरकारचं भवितव्य रविवारी होणार निश्चित, Floor Test पूर्वीच निर्णायक परीक्षा

राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सरकार स्थापन झाले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

    मुंबई, 1 जुलै : राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सरकार स्थापन झाले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी येत्या शनिवारी म्हणजेच 2 जुलैला विशेष अधिवशेन भरवण्याचा आदेश राज्यपालांनी दिला होता. पण आता हे सत्र 3 आणि 4 जुलै रोजी होणार आहे. शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीपूर्वी (Floor Test) एकनाथ शिंदे सरकारची विधानसभेत परीक्षा होईल. रविवारी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होईल. याच निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत शनिवारपर्यंत आहे. रविवारी अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सरकारनं बाजी मारली तर शिंदे सरकारचे विधानसभेतील बहुमत सिद्ध होईल. त्यानंतर विश्वासदर्शक ठराव ही औपचारिकता असेल. त्यामुळे शिंदे सरकारची खरी परीक्षा रविवारी होणार आहे. या सरकारला कोणत्याही परिस्थितीमध्ये विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकावी लागेल. विधानसभा अध्यक्षपदाला असलेले घटनात्मक अधिकार लक्षात घेता शिंदे सरकारकडून त्यासाठी कुणाची निवड केली जाते हे पाहणे महत्त्वाचे आहे. या पदासाठी भाजपाकडून राधाकृष्ण विखे पाटील तर शिंदे गटाकडून दीपक केसरकर यांचे नाव चर्चेत आहे. हे दोन्ही नेते अनुभवी असून राजकीय कसोटीच्या प्रसंगी त्यांचा अनुभव कामी येऊ शकतो. अर्थात भाजपाकडून ऐनवेळी धक्कातंत्राचा वापर करून नव्या नावाचा प्रस्तावही सादर केला जाऊ शकतो. मोठी बातमी : फडणवीस आणि धनंजय मुंडेंमध्ये झाली मध्यरात्री खलबतं महाविकास आघाडीकडून या निवडणुकीसाठी अद्याप कोणतेही नाव जाहीर झालेले नाही. यापूर्वी हे पद काँग्रेसकडे होते. नाना पटोळे यांनी राजीनामा दिल्यापासून ते रिक्त आहे. आता बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी कुणाचे नाव पुढे केले जाते ते पाहणे महत्त्वाचे आहे.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Devendra Fadnavis, Eknath Shinde, Vidhansabha

    पुढील बातम्या