मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

‘या’ तारखांना लागू शकतात 10वी आणि 12वीचे निकाल, शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

‘या’ तारखांना लागू शकतात 10वी आणि 12वीचे निकाल, शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

चालू शैक्षणिक वर्षात शालेय विद्यार्ध्यांचे नुकसान होई नये यासाठी, राज्य सरकारने विद्यार्थ्यांसाठी ई-शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतलांय.

मुंबई 16 जून: कोरोनामुळे सगळ्याच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. आता सगळ्यांना काळजी लागलीय ती शाळा आणि कॉलेजेसची त्याच बरोबर 10वी आणि 12वीच्या निकालांची. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी त्याचे संकेत दिले आहेत. 12वीचा निकाल 15 जुलैच्या आसपास तर 10वीचा निकाल जुलै महिन्याच्या शेवटी लागण्याची शक्यता आहे अशी माहितीही वर्षा गायकवाड यांनी दिली. कोरोना विषाणुंचा संसर्ग सुरूच आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात शालेय विद्यार्ध्यांचे नुकसान होई नये यासाठी, राज्य सरकारने विद्यार्थ्यांसाठी ई-शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतलांय. आणि ज्या विद्यार्थ्यांना ई-शिक्षण घेण्यास अडचणी आहेत अशा विद्यार्थ्यांना दूरदर्शन आणि रेडियोच्या माध्यमातूनही शिक्षण देण्यासाठी सुरवात करत असल्याची माहीती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलीय. विद्यार्थी शाळेत जात नसून देखील काही शाळा विद्यार्थ्यांकडून कँटिंन, हाऊसकिपींग आणि स्पोर्टच्या फी मागत आहेत. शाळा चालकांनी पालकांवर दबाव टाकू नये असं मतही त्यांनी व्यक्त केलं. या परिक्षा सुरू असतानाच कोरोनाचं संकट आलं होतं. 12वीची परिक्षा पूर्ण झाली होती. मात्र 10वीचा भूगोलाचा पेपर राहिला होता. नंतर तो रद्दच करण्यात आला होता. सरकारसमोर पेपर तपासण्याचंही मोठं आव्हान होतं. मात्र आता हे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असून शेवटच्या टप्प्यात काम आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नेमक्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.    
First published:

Tags: 10th result date, 12th exam result date

पुढील बातम्या