मुंबई आणि राज्यात आजही कोरोना रुग्णांची धक्कादायक वाढ, सरकारची चिंता वाढली

मुंबई आणि राज्यात आजही कोरोना रुग्णांची धक्कादायक वाढ, सरकारची चिंता वाढली

मुंबईत २४ तासांमध्ये १४३० रुग्ण वाढले आहेत. दरम्यान रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सरकारने सुविधांची मोठ्या संख्येने निर्मिती सुरू केली आहे.

  • Share this:

मुंबई 25 मे: मुंबई आणि राज्यात कोरोना रुग्णांचा होणारा गुणाकार आजही कायम राहिला आहे. राज्यात आजही उच्चांकी २४२६ नवे रुग्ण सापडले. तर ६० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ५२६६७ एवढी झाली आहे. त्यात ॲक्टिव्ह केसेस ३५१७८ एवढ्या आहेत. तर आज ११८६ जणांचा डिस्चार्ज मिळाला. मुंबईत २४ तासांमध्ये १४३० रुग्ण वाढले आहेत. दरम्यान रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सरकारने सुविधांची मोठ्या संख्येने निर्मिती सुरू केली आहे.

बीकेसी येथे एमएमआरडीने १५ दिवसांत उभारले देशातील पहिले ओपन हॉस्पिटल ( १००० बेड्सची जम्बो सुविधा ). याचठिकाणी २०० बेड्सची आयसीयू सुविधाही तिथे आहेत.

महालक्ष्मी येथे कोरोना केअर सेंटरचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु. ६०० बेड्सची सुविधा यात १२५ बेडचे आयसीयू वॉर्ड असतील. कोविड १९च्या मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना येथे ठेवले जाईल.

नेसको गोरेगाव येथे ५३५ बेड्सची सुविधा असलेली जम्बो सुविधा कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध आहेत.

रेसकोर्स, दहिसर, गोरेगाव, मुलुंड येथे ७००० पेक्षा जास्त बेड्सची सुविधा असलेली डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सेंटर आणि डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल पुढील २ आठवड्यात तयार होणार आहे.

विमान प्रवास करायचाय? 14 दिवस क्वारंटाइन झालं बंधनकारक; हे आहेत नवे नियम

३१ मे पर्यंत एसएससीआय वरळी, महालक्ष्मी, बांद्रा व नेस्को गोरेगाव अशा मिळून २४७५ खाटा असलेल्या सुविधा रुग्ण सेवेत आहेत.

प्रत्येक वॉर्डमध्ये किमान १०० खाटा आणि २० आयसीयू खाटा असलेल्या रुग्णालयांची सुविधा ताब्यात घेतली.

स्वत:च्या विलगीकरणाची सोय नसलेल्या कोविड रुग्णांसाठी ३० हजार खाटा क्षमतेच्या कोव्हीड केअर सेंटरची व्यवस्था

मुंबईतील खाटांचे नियोजन आता संगणकाच्या माध्यमातून होणार त्यामुळे कोणत्या ठिकाणी खाटा उपलब्ध आहेत ते लगेच कळेल. खाटांचा डाटा रिअल टाईम डॅशबोर्डमध्ये. प्रत्येक बेडला युनिक आयडी. डिस्चार्ज धोरणाची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

रुग्णालयांची स्वच्छता, जेवण व इतर अनुषंगिक बाबींतून डीन यांची जबाबदारी कमी केली. आरोग्य उपचारांवर अधिक लक्ष देता येणे शक्य.

रुग्णवाहिका १०० वरून ४५० वर. या सेवेसाठी देखील मोबाईल App तयार करण्यात आलं आहे.

लॉकडाऊनमध्ये अक्षय कुमार करतोय जाहिरातीचं शूटिंग, सेटवरील Photo Viral

केइएम, नायर, सायन, जेजे, सेंट जॉर्ज आणि बीएमसी पेरिफेरल रुग्णालये यांची जबाबदारी ५ आयएएस अधिकाऱ्यांकडे. प्रत्येक रुग्णालयात वॉर रूम. सीसीटीव्हीचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

मनपातर्फे दररोज ७ लाख अन्नाची पाकिटे वाटप करण्यात येत असून मुंबईत ३६० फिव्हर क्लिनिक तयार करण्यात आले आहेत. तर १९१६ हेल्पलाईनवर ६५ हजार कॉल्स आत्तापर्यंत आल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

 

First published: May 25, 2020, 8:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading