म्हाडा अध्यक्षांच्या पत्राने खळबळ, माझ्या जीवाचं बरं वाईट झाल्यास प्रशासन जबाबदार

माझ्या जीवाला विकासक आणि समाजकंटकांपासून धोका आहे असं पत्र म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी पोलिस खात्याला दिलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 19, 2018 12:08 PM IST

म्हाडा अध्यक्षांच्या पत्राने खळबळ, माझ्या जीवाचं बरं वाईट झाल्यास प्रशासन जबाबदार

उदय जाधव, प्रतिनिधी

मुंबई, 19 डिसेंबर : माझ्या जीवाला विकासक आणि समाजकंटकांपासून धोका आहे असं पत्र म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी पोलिस खात्याला दिलं आहे. माझ्या जीवाचं बरं वाईट झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार असल्याचा इशाराही सामंतांनी दिला. गेल्या अनेक दिवसांपासून मला धमक्यांचे फोन येत आहे. त्यामुळे माझ्या जीवाला धोका असल्याचं सामंत म्हणाले.

काही अज्ञातांकडून धमक्या येत असल्याचा खळबळजनक खुलासा सामंत यांनी या पत्राद्वारे केला. अनधिकृत विकासकांच्या विरोधात निर्णय घेतल्यानं माझ्या जीवाला धोका असल्याचं उदय सामंत यांनी पत्रात नमूद केलं आहे. गेल्या तीन महिन्यापासून सामंत हे म्हाडाचा कारभार सांभाळत आहेत.


म्हाडाच्या लॉटरीमध्ये मोठा भ्रष्टाचार, निलेश राणेंचा उदय सामंत यांच्यावर आरोप

Loading...

एकीकडे मुंबईतल्या म्हाडाच्या लॉटरीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनाच म्हाडाची घरं कशी लागतात असा थेट सवाल त्यांनी उदय सामंतांना विचारला आहे.

दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या म्हाडाच्या लॉटरीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं निलेश राणेंनी वक्तव्य केलं. उदय सामंत यांनी शिवसेनेतील त्यांच्या निकटवर्तींयांना घरं मिळवून देण्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. तर यात शिवसेनेच्या निलम शिर्के यांना मिळालेल्या घराचा उल्लेखही त्यांनी केला आहे. सोबतच उदय सामंतांची कुंडली निवडणुकीपूर्वी जनतेसमोर मांडू असंही निलेश राणे म्हणाले.

नितेश राणे यांनी रामदास कदमांना तर त्यांचे थोरले बंधू निलेश राणे यांनी म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांना टारगेट केल्याचं बोललं जात आहे. टक्केवारीवर काम करणाऱ्या उदय समंतांची कुंडली निवडणुकीपूर्वी जनसमोर मांडू असा इशारा देत स्वाभिमान पक्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचा पुनरुच्चारही निलेश राणेंनी केला.


VIDEO : 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत होणार ही मोठी घडामोड


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 19, 2018 12:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...