Loksabha 2019 : निवडणुकांमुळे म्हाडाच्या घरांची सोडत ढकलली पुढे

Loksabha 2019 : निवडणुकांमुळे म्हाडाच्या घरांची सोडत ढकलली पुढे

म्हाडाची सोडत पुढे ढकलली असली तरी अर्जाच्या मुदतीत बदल करण्यात आलेला नाही.

  • Share this:

मुंबई, 18 मार्च : म्हाडाने मुंबईतील घरांसाठी जाहीर केलेली 21 एप्रिलची सोडत आगामी लोकसभा निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. मुंबईत 217 घरांसाठी म्हाडाने 21 एप्रलिला सोडत जाहीर करणार असल्याचे म्हटले होते. मात्र निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही सोडत निकालानंतरच होणार आहे.

गेल्या आठवड्यात लोकसभेच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले. त्यानंतर आचारसंहिता लागू झाल्याने म्हाडाची सोडत जाहीर करता येणार नाही. म्हाडाने आचारसंहितेपूर्वी सोडत काढण्याचे जाहीर केले होते. यानुसार बँकेत अनामत रक्कम भरुन अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 एप्रिल दिली होती. त्यानंतर ही सोडत ऑनलाईन जाहीर करण्यात येणार होती.

लोकसभा निवडणुकीमुळे म्हाडाची ही सोडत पुढे ढकलण्यात आली आहे. आता 23 मे ला लोकसभेची मतमोजणी झाल्यानंतर ही सोडत होईल. म्हणजेच सोडत किमान एक महिना पुढे ढकलण्यात आली आहे. सोडत पुढे ढकलली असली तरी अर्जाच्या मुदतीत बदल करण्यात आलेला नाही. 13 एप्रिल हीच अर्जासाठी अंतिम मुदत आहे.

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या आतापर्यंत 10 हजारांहून अधिक आहे. आता सोडत कधी होणार हे म्हाडाकडून जाहीर केले जाईल. किमान जूनपर्यंत तरी ही सोडत जाहीर होण्याची शक्यता नाही.

VIDEO : 'पप्पू की पप्पी', प्रियांका गांधींबद्दल बोलताना भाजप मंत्र्याची जीभ घसरली

First published: March 18, 2019, 11:26 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading