मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

MHADA Lottery 2021: 8948 घरांची सोडत जाहीर; इथे पाहा कुणाला दसऱ्याला मिळणार घर

MHADA Lottery 2021: 8948 घरांची सोडत जाहीर; इथे पाहा कुणाला दसऱ्याला मिळणार घर

 आज सकाळी 10 वाजल्यापासून या घरांच्या सोडतीला सुरुवात झाली. एकेका संकेत क्रमांकानुसार, ऑनलाइन सोडत काढण्यात आली. प्रथम आलेल्या 100 जणांना सभागृहात बसण्याची परवानगी देण्यात आली होती.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 14 ऑक्टोबर : आज म्हाडा कोकण मंडळाच्या 8 हजार 948 घरांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. म्हाडानं गेल्या महिन्यात ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती. या लॉटरीतील 8 हजार 948 घरांसाठी तब्बल 2 लाख 46 हजार अर्ज आले होते. आज सकाळी 10 वाजल्यापासून या घरांच्या सोडतीला सुरुवात झाली. एकेका संकेत क्रमांकानुसार, ऑनलाइन सोडत काढण्यात आली. प्रथम आलेल्या 100 जणांना सभागृहात बसण्याची परवानगी देण्यात आली होती.

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते सोडतीचा आरंभ झाला असून यावेळी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील, नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, तसेच ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आदी उपस्थित होते. तर गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ऑनलाईन कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या http://mhada.ucast.in या संकेतस्थळावरून सोडतीचे थेट प्रक्षेपण करण्यात आलं.

हे वाचा - Aryan Khan case: आर्यन खान ड्रग्जचा नियमित ग्राहक असल्याचा दावा, ‘जामीन मिळाला तर पुरावे नष्ट करेल’-NCB

सोडतीसाठी दोन लाख 46 हजार 650 नागरिकांनी अर्ज भरले आहेत. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नागरिकांना हक्काच्या घराची गोड बातमी मिळावी म्हणून ढोल-तुतारीच्या निनादात सोडतीचे नियोजन करण्यात आले होते. ठाण्यातील कार्यक्रमास उपस्थित राहू इच्छिणाऱ्या अर्जदारांनी स्वतःचे ओळखपत्र व अर्जाची मूळ पावती सोबत आणावी, असे आवाहन मंडळाने केले होचे. सोडतीचा निकाल आज सायंकाळी 6 वाजता https://lottery.mhada.gov.in आणि https://mhada.gov.in संकेतस्थळांवर प्रसिद्ध केला जाईल, अशी माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन महाजन यांनी दिली.

हे वाचा - ऑनलाइन Ludo खेळताना जडलं प्रेम, लग्नासाठी तरुणीने केला 1,650 किमीचा प्रवास; पुढे असा विचित्र Twist आला की…

म्हाडाच्या (MHADA) कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे विविध गृहप्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या 8 हजार 984 सदनिकांची (Apartment) संगणकीय सोडत ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये (dr Kashinath ghanekar theatre) आज गुरुवारी काढण्यात आली.

First published:

Tags: Konkan, Mhada lottery