S M L

म्हाडाची 819 घरांची जाहिरात प्रसिद्ध, कुठे किती घरं ?, पाहा इथं

या घरांसाठी 16 सप्टेंबरपासून अर्ज करता येणार आहे आणि 10 नोव्हेंबरला लॉटरी सोडत जाहीर होईल.

Sachin Salve | Updated On: Sep 15, 2017 10:49 AM IST

म्हाडाची 819 घरांची  जाहिरात प्रसिद्ध, कुठे किती घरं ?, पाहा इथं

15 सप्टेंबर : मुंबईत हक्का घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खुश खबर. मुंबईतल्या घरांसाठीच्या लॉटरीची जाहिरात आज प्रसिद्ध झालीय.  819 घरांसाठीच्या लॉटरीची जाहीरात आहे ही. अल्प, मध्यम आणि उच्च गटांसाठी ही घरं आहेत. 16 सप्टेंबरपासून या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.  तर 10 नोव्हेंबरला या घरांची सोडत जाहीर होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतल्या म्हाडांच्या घरांच्या लॉटरीची प्रतीक्षा होती.

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबई विभागातील विविध वसाहतीतील 819 घरांसाठी ही लॉटरी असणार आहे. 10 नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात संगणकीय सोडत काढण्यात येईल.

सदर सोडतीकरिता जाहिरात शुक्रवार, दि. 15 सप्टेंबर 2017 रोजी विविध वर्तमानपत्रांमध्ये आणि म्हाडाच्या https://mhada.maharashtra.gov.in/  या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे  अशी माहिती मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांनी दिली.

महत्त्वाच्या तारखा

Loading...
Loading...

- म्हाडाच्या htpps://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर अर्जदाराची नोंदणी दि. १६/०९/२०१७ रोजी दुपारी २ वाजेपासून दि. २१/१०/२०१७ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत केली जाणार

- २२/१०/२०१७ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत बदल करता येणार

- नोंदणीकृत अर्जदारांसाठी ऑनलाईन अर्ज  २२/१०/२०१७ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत भरता येणार

बँकेत डीडी स्वीकृती

दि. १७/०९/२०१७ ते २५/१०/२०१७ या कालावधीत स्वीकरले जाणार

 NEFT / RTGS द्वारे अनामत रक्कम

यंदा प्रथमच अर्जदारांना NEFT / RTGS द्वारे अनामत रक्कम भरण्याचा पर्याय देण्यात आला आहे. NEFT / RTGS द्वारे चलन निर्मिती  १७/०९/२०१७ दुपारी २ ते २३/१०/२०१७ रोजी रात्री १२ पर्यंत करता येणार आहे.

 डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंगद्वारे अनामत रक्कम दि. १७/०९/२०१७ रोजी दुपारी २ ते दि. २४/१०/२०१७ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत स्वीकारली जाणार आहे.

अर्जदाराची उत्पन्न मर्यादा

अत्यल्प उत्पन्न गटाकरिता २५,०००/- पर्यंत

अल्प उत्पन्न गटाकरिता रु. २५,००१ ते रु. ५०,०००

मध्यम उत्पन्न गटाकरिता रु. ५०,००१ ते रु. ७५,०००

उच्च उत्पन्न गटाकरिता अर्जदाराचे रु. ७५,००१ त्यापेक्षा जास्त

कोणत्या गटासाठी किती अनामत रक्कम

अत्यल्प उत्पन्न गटाकरिता रु. १५,३३६/- प्रति अर्ज

अल्प उत्पन्न गटाकरिता रु. २५,३३६ प्रति अर्ज

 मध्यम उत्पन्न गटाकरिता रु. ५०,३३६ प्रति अर्ज

 उच्च उत्पन्न गटाकरिता रु. ७५,३३६ प्रति अर्ज

ऑनलाईन अर्जापोटी प्रतिअर्ज रु. ३३६ (विना परतावा) अर्ज शुल्काचा समावेश आहे.

अत्यल्प उत्पन्न गटासाठी कुठे घरे?

यंदा अत्यल्प उत्पन्न गटासाठी प्रतीक्षा नगर-सायन, मानखुर्द, चांदिवली, मागाठाणे-बोरिवली या ठिकाणी एकूण आठ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.

अल्प उत्पन्न गटासाठी कुठे घरे?

अल्प उत्पन्न गटाकरिता कन्नमवार नगर विक्रोळी, चारकोप कांदिवली (पश्चिम), सिद्धार्थ नगर – गोरेगाव (पश्चिम), चांदिवली, मानखुर्द, मालवणी मालाड येथील १९२ सदनिकांचा समावेश

मध्यम उत्पन्न गटासाठी कुठे घरे?

मध्यम उत्पन्न गटाकरिता प्रतीक्षा नगर- सायन, सिद्धार्थ नगर – गोरेगाव (पश्चिम), उन्नत नगर- गोरेगाव (पश्चिम), चारकोप कांदिवली (पश्चिम), गायकवाड नगर- मालवणी मालाड येथील एकूण २८१ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.

उच्च उत्पन्न गटासाठी कुठे घरे?

तर उच्च उत्पन्न गटाकरिता लोअर परेल– मुंबई, तुंगा – पवई, चारकोप कांदिवली (पश्चिम), शिंपोली -कांदिवली (पश्चिम) येथील एकूण ३३८ सदनिकांचा सोडतीत समावेश

कुठे किती घरं?

अत्यल्प गट 8 घरं : प्रतीक्षा नगर- सायन, मानखुर्द, चांदिवली, मागाठाणे-बोरिवली

अल्प उत्पन्न गट 192 घरं: कन्नमवार नगर विक्रोळी, चारकोप  कांदिवली (पश्चिम), सिद्धार्थ नगर – गोरेगाव (पश्चिम), चांदिवली, मानखुर्द, मालवणी मालाड

मध्यम उत्पन्न गट 281 घरं: प्रतीक्षा नगर- सायन,  सिद्धार्थ नगर – गोरेगाव (पश्चिम),  उन्नत नगर- गोरेगाव (पश्चिम), चारकोप कांदिवली (पश्चिम), गायकवाड नगर- मालवणी मालाड

उच्च उत्पन्न गट 338 घरं: लोअर परेल – मुंबई, तुंगा – पवई, चारकोप  कांदिवली (पश्चिम), शिंपोली – कांदिवली (पश्चिम)

 कोणत्या गटासाठी किती घरं?

अत्यल्प उत्पन्न गट – 8 घरं

अल्प उत्पन्न गट – 192 घरं

मध्यम उत्पन्न गट – 281 घरं

उच्च उत्पन्न गट – 338 घरं

एकूण – 819

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 14, 2017 07:37 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close