मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

राज्यातल्या 300 आमदारांना कुठे मिळणार घरं? जागेसाठी म्हाडाला मिळालं Prime Location

राज्यातल्या 300 आमदारांना कुठे मिळणार घरं? जागेसाठी म्हाडाला मिळालं Prime Location

आमदारांना घर देण्याच्या म्हाडाच्या (Mhada) जागेसाठी गोराईचा पर्याय म्हाडाकडे आहे. गोराईच्या प्राईम जागेचा (gorai prime location) म्हाडा विचार करतंय असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई, 18 एप्रिल : आमदारांना घर देण्याच्या म्हाडाच्या (Mhada) जागेसाठी गोराईचा पर्याय म्हाडाकडे आहे. गोराईच्या प्राईम जागेचा (Gorai Prime Location) म्हाडा विचार करतंय असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आतापर्यंत आतापर्यंत घरासाठी सुमारे 65 ते 70 आमदारांनी गृहनिर्माण मंत्र्यांची भेट घेतली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. हे आमदार मराठवाडा आणि विदर्भातील आहेत. या घरांची किंमत सुमारे 1 कोटी रुपये इतकी किंमत असेल. 300 आमदारांना घरं देऊन बाकी घरं ही सोडतीत सामान्य नागरिकांसाठी दिली जाणार आहेत. आमदारांच्या घरांवरुन राज्यात सर्वत्र टीका - अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी 300 आमदारांना (300 Flat for MLA)  घरं बांधून देणार अशी घोषणा केली होती. या घोषणेवरून राज्यभरात एकच चर्चा रंगली असून भाजपनेही यावर आक्षेप घेतला होता. मात्र, आमदारांना मोफत घरं दिली जाणार नसून त्यांची किंमत आमदारांना आकारली जाणार आहे, असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी अधिवेशनात बोलत असताना 300 आमदारांना मुंबईत घरं बांधून दिली जाणार आहे, अशी घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर राज्यभरात आमदारांना घरं का द्यावी याबद्दल उलटसुलट चर्चा रंगली होती. अखेर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत स्पष्टीकरण दिले आहे. हे वाचा - नाशिक पोलीस आयुक्तांच्या आदेशावर शिक्कामोर्तब, धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसंदर्भात राज्य सरकारनं घेतला निर्णय आमदारांना घरं देण्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. 'आमदारांना कशाला घर कशाला हवं आहे. कुणी आमदार व्हायला नारळ दिला नव्हता. मी म्हणतो घर कशाला हवे. या लोकाना रोज डिप्लोमेसी करावी लागत आहेत. मुळात महाविकास आघाडीचे आमदार फुटू नये म्हणून ही घोषणा केली आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Mhada lottery, Mla

पुढील बातम्या