Home /News /mumbai /

mhada exam : म्हाडा परीक्षेच्या तारखेत बदल, जितेंद्र आव्हाडांनी विद्यार्थ्यांची मागितली माफी!

mhada exam : म्हाडा परीक्षेच्या तारखेत बदल, जितेंद्र आव्हाडांनी विद्यार्थ्यांची मागितली माफी!

सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक या संवर्गाकरीला 29 आणि 30 जानेवारी 2022 रोजी ऑनलाइन परीक्षा होणार होती.

सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक या संवर्गाकरीला 29 आणि 30 जानेवारी 2022 रोजी ऑनलाइन परीक्षा होणार होती.

सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक या संवर्गाकरीला 29 आणि 30 जानेवारी 2022 रोजी ऑनलाइन परीक्षा होणार होती.

विनोद राठोड, प्रतिनिधी मुंबई, 03 जानेवारी : राज्यात आरोग्य भरती परीक्षा आणि टीईटी परीक्षेचा पेपर फुटी प्रकरण (tet paper leck case) समोर आल्यामुळे दररोज नव नवीन खुलासे होत आहे. तर ऐन परीक्षेच्या आदल्या रात्रीच म्हाडा भरती परीक्षेचा (mhada recruitment 2021 exam)  पेपर पुढे ढकलण्यात आला होता. पण, आता पुन्हा एकदा म्हाडाच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. म्हाडा प्राधिकरणाच्या वतीने क्लस्ट 6 मधील सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक या संवर्गाकरीला 29 आणि 30 जानेवारी 2022 रोजी ऑनलाइन परीक्षा होणार होती. पण ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन परीक्षेची तारीख ही म्हाडा विभागाकडून लवकरच जाहीर केली जाणार आहे. (तुम्हीही Jio युजर्स आहात का? सावधान, चुकूनही करू नका ही चूक अन्यथा...) 'म्हाडाच्या परीक्षा जाहीर झाल्या आहेत. पण एका तारखेत बदल करावा लागणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक परीक्षा रद्द केली आहे.  महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि म्हाडाच्या प्राधिकरणाची परीक्षा एकाच दिवशी आली आहे. खरंतर एमपीएससीने तपासायला पाहिजे होते. कुठल्या विभागाने कुठल्या ठिकाणी परीक्षा जाहीर केली आहे. त्यामुळे यावर वाद न घालता. एक दिवशीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. तसंच, म्हाडाची परीक्षा पुढे ढकलेली नाही, पण राज्यभरातून जे विद्यार्थी येणार होते, त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी विद्यार्थ्यांनी माफी मागितली आहे. (विराटचं एबीच्या पावलावर पाऊल, या कारणामुळे जोहान्सबर्ग टेस्टमधून माघार!) याआधीही ऐन परिक्षेच्या आदल्या रात्री म्हाडाच्या परिक्षेचा पेपर फुटला होता. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढावली होती.  कंत्राटी एजन्सीचा संचालक प्रीतिश देशमुख हा पेपर फोडण्याच्या प्रयत्नात असतानाच पुणे पोलिसांनी त्याला रंगेहात अटक केली होती. त्यामुळे 11 डिसेंबरच्या मध्यरात्रीच म्हाडाची परीक्षा ऐनवेळी रद्द करावी लागली होती. तीच परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या