• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • दिवाळीत म्हाडाचा बंपर धमाका, मुंबईत 4000 घरांची लॉटरी!

दिवाळीत म्हाडाचा बंपर धमाका, मुंबईत 4000 घरांची लॉटरी!

विशेष म्हणजे, गोरेगाव आयटी पार्कपासून ही जागा जवळ असल्याने बर्‍यापैकी प्राईम लोकेशन आहे.

  • Share this:
मुंबई, 14 फेब्रुवारी : 'आली माझ्या घरी दिवाळी असं नाही तर दिवाळीत मी आलो माझ्या घरी' अशी म्हणायची सुखद वेळ अनेकांवर येणार आहे कारण ही तसंच आहे. दिवाळीत मुंबईतल्या चार हजार घरांसाठी लॉटरी (mhada lottery 2020) काढली जाणार आहेत. मुंबईत घर घेणाऱ्या मुंबईत दिवाळीत चार हजार घरांची लॉटरी काढली जाणार आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे यापैकी जवळपास 3400 घर ही एकट्या गोरेगावमध्ये असतील. म्हाडाच्या जागेवर ही घर बांधली गेली असल्याने मागच्या अशा अनेक वर्षातील घरांच्या किंमतीपेक्षा बऱ्यापैकी कमी किंंमत असण्याची शक्यताा वर्तवली  जात आहे. विशेष म्हणजे, गोरेगाव आयटी पार्कपासून ही जागा जवळ असल्याने बर्‍यापैकी प्राईम लोकेशन आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी 'आम्ही लवकरच मुंबईत घरांसाठी लॉटरी काढू' असं घोषित करताच अधिकारी कामाला लागले आहेत आणि कुठे कुठे किती किती घर आहेत याचा अंदाज एकूण बांधला जात आहे. म्हाडातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाडाची घरं बांधून झाल्याशिवाय लॉटरी काढली जाणार नाही आणि हे काम साधारणपणे दिवाळीच्या आसपास संपण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच दिवाळीत ही चार हजार घरांची लॉटरी काढली जाणार आहे. 2016 च्या लॉटरीतील अजूनही काही घरं लाभार्थ्यांना दिली नसल्याने  यावेळी मात्र ओसी मिळाल्याशिवाय लॉटरी न करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. मार्चमध्ये 7500 घरांची लॉटरी होणार आहे, पण ती कोकण बोर्डाची म्हणजेच  मुंबईच्या जवळपास नवी मुंबई, ठाणे, कल्याण या परिसरात होणार आहेत. म्हणजे, ज्यांना या लॉटरीमध्ये घरे मिळाली नाहीत, अशांना पुन्हा एकदा याच वर्षी घरांसाठी अर्ज करण्याची संधी मिळणार आहे आणि तीही मुंबईत. जसजशी महागाई वाढत चालली आहे, तसे मुंबई आणि मुंबईच्या आसपास घर घेण्याची इच्छा असणारेही कधीकधी हतबल होतात. कारण, इच्छा असून उपयोग नाही त्यासाठी पैसा असणे गरजेचं असतं अशा वेळेला मात्र म्हाडा धावून येते. कारण खाजगी बिल्डरांपेक्षा कमी किंमती  परवडणारी घरं असतात. लोअर परेल येथील बीडीडीचाळीत त 242 लोकांसाठी नुकतीच म्हाडामार्फत लॉटरी काढली गेली.
Published by:sachin Salve
First published: