मुंबई, 18 ऑक्टोबर : राज्य अनलॉक होत असताना मुंबईत सोमवारपासून मेट्रो सेवेला (mumbai metro) पुन्हा सुरुवात होणार आहे. कोरोनाच्या दृष्टीने योग्य खबरदारी घेत मेट्रो सेवा सुरू होईल. खरंतर राज्य सरकारने 15 ऑक्टोबरपासूनच मेट्रो सेवा सुरू करण्यास परवानगी दिली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे आता अखेर 19 ऑक्टोबरपासून (mumbai metro timings) या सेवेचा प्रारंभ होत आहे.
मुंबई मेट्रोने प्रवास करण्याआधी जाणून घ्या ही माहिती :
1. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगची सक्ती असणार, प्रवेशद्वारावरच प्रवाश्यांचं स्क्रीनिंग होणार
2. सकाळी 8.30 ते रात्री 8.30 या वेळेत मेट्रो धावणार
3. लहान मुलं आणि वयोरुद्ध नागरिकांना मेट्रोचा प्रवास टाळण्याचं आवाहन
4. पीटीआयच्या वृत्तानुसार, 1,350 प्रवाश्यांची क्षमता असणाऱ्या मेट्रोमध्ये केवळ 360 लोकांना प्रवासाची मुभा
5. डिजिटल तिकीट, स्मार्ट कार्ड किंवा क्यूआर कोड आधारित तिकीटाचा अधिकाधिक वापर कऱण्याचं आवाहन.
6. मेट्रो प्रवासादरम्यान देण्यात येणारं प्लास्टिकचं टोकन दिलं जाणार नाही
7. प्रवासामध्ये कमीत कमी साहित्य न्यावं
8. मेट्रोमध्ये खूना केलेली जागा रिक्त ठेवण्याचं आवाहन
9. आरोग्य सेतू अॅपचा वापर करण्याच्या सूचना
10. कोचमध्ये तापमान 25-27 डिग्री सेल्सिअस दरम्यान ठेवण्यात येईल
उपराजधानीतही सुरू झाली आहे मेट्रो सेवा
सुरक्षेच्या मानकांचे पालन करत राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वी महामेट्रोची प्रवासी सेवा सुरू झाली. कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर मेट्रो स्थानक तसेच गाडीत विशेष उपाय योजना करण्यात आल्या. सुरक्षेचं पालन करत, महा मेट्रोची प्रवासी सेवा सुरू झाली. कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर, प्रवासी आणि मेट्रो कर्मचारी तसेच अधिकार्यांचा प्रवास सुरक्षित असावा या करीता अनेक महत्वाच्या उपाय योजना करण्यात आल्या आहेत. सरकारने कोव्हिडच्या बचावासंबंधी जाहीर केलेल्या सूचना आणि नियमांसह ही सेवा सुरू झाली.