Elec-widget

VIDEO : मेट्रो-3 चा आणखी टप्पा पार, शिवसेनाभवनापर्यंत भुयारीकरण पूर्ण

VIDEO : मेट्रो-3 चा आणखी टप्पा पार, शिवसेनाभवनापर्यंत भुयारीकरण पूर्ण

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-3 मार्गिकेचे काम जलदगतीने करण्यात येत आहे

  • Share this:

स्वाती लोखंडे, प्रतिनिधी

मुंबई, 31 जानेवारी : मुंबई मेट्रो भरारीच्या कामात आज आणखी एक टप्पा पार पडला आहे. माहिम येथील नयानगर लाँचिंग शाफ्टमधून भुयारीकरणास प्रारंभ करणाऱ्या कृष्णा 1 आणि कृष्णा 1 या टनेल बोअरिंग मशीनने (टीबीएम) दादरपर्यंतचे भुयारीकरण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. एकाच दिवशी जुळ्या बोगद्यातून दोन्ही ही टीबीएम्स बाहेर पडणे हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-3 मार्गिकेचे काम जलदगतीने करण्यात येत आहे. यापूर्वी सीप्झ आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन ठिकाणी भुयारीकरण (ब्रेक थ्रु) पूर्ण करण्यात आले आहे. आज दादर येथील शिवसेनाभवनापर्यंतचा महत्त्वाचा टप्पा गाठण्यात यश मिळालं आहे.

कृष्णा 1 आणि 2 या दोन टनेल बोअरिंग मशीन नयानगर लाँचिंग शाफ्ट माहिम येथून अनुक्रमे 21 सप्टेंबर 2017 आणि 18 ऑक्टोबर 2017 रोजी भूगर्भात उतरवण्यात आल्या होत्या. नयानगर माहिमपासून ते दादर मेट्रो स्थानकापर्यंत अप मार्गावर 2490 मीटर भुयारीकरण करण्यासाठी कृष्णा -1 या टीबीएमसाठी 1779 इतक्या आरसीसी सिमेंट रिंग्सचा वापर करण्यात आला.

कृष्णा 2 या डाऊन मार्गावरील टीबीएमसाठी 2472 मीटर भुयारीकरणासाठी 1766१ इतक्या आरसीसी रिंग्सचा वापर करण्यात आला. कृष्णा 1 व 2 द्वारे सरासरी दररोज 10 ते 12 मीटर भुयारीकरण करण्यात आले आहे.

Loading...

या संपूर्ण भुयारीकरणात अभियांत्रिकी तज्ज्ञ आणि कामगार यांच्या 100 जणांच्या दोन तुकडीने बेसाल्ट, टफ आणि ब्रेशिया सारख्या कठीण खडकांना भेदत महत्त्वाचा टप्पा गाठला. कृष्णा 1 आणि 2 हे हॅरॅन्कनेट या जर्मनी बनावटीचे टीबीएम मशीन आहे, आणि त्याची लांबी 108 मीटर इतकी असून हे प्रत्येकी 400 टन इतक्या वजनाचे आहे.

सध्या सर्व 17 टीबीएम्स मुंबईच्या भूगर्भात काम करत आहेत आणि 18 किमी.पेक्षा अधिक म्हणजेच एकूण 35% भुयारीकरण पूर्ण झाले आहे.

===========================================बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 31, 2019 06:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com