• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • मेट्रो 3चं काम रात्री 10 ते 6 बंद राहणार !

मेट्रो 3चं काम रात्री 10 ते 6 बंद राहणार !

मेट्रो ३ चं काम रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत बंद ठेवण्याच निर्देश मुंबई हायकोर्टाने दिलेत. रात्रीच्या कामामुळे आसपासच्या नागरिकांना त्रास होत असल्याच्या याचिकेवर हे निर्देश देण्यात आलेत.

  • Share this:
मुंबई, 10 ऑगस्ट : मेट्रो ३ चं काम रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत बंद ठेवण्याच निर्देश मुंबई हायकोर्टाने दिलेत. रात्रीच्या कामामुळे आसपासच्या नागरिकांना त्रास होत असल्याच्या याचिकेवर हे निर्देश देण्यात आलेत. कफ परेड भागातील रहिवाशी रॉबिन जयसिंगानी या व्यक्तीनं ही याचिका दाखल केली होती. कुलाबा-वांद्रे-सीप्झ असा मेट्रो 3चा मार्ग आहे. 33.5 किमी अंतराचा हा मार्ग अंडरग्राऊंड अर्थात भुयारी आहे. या मार्गावर सध्या दिवसरात्र वेगाने खोदकाम सुरु आहे. मात्र रात्रीच्या वेळी यंत्रांचा आवाज, आणि खोदकाम यामुळे स्थानिक रहिवाशांना त्रास होतो. त्यांची झोडमोड होते. म्हणून किमान रात्रीच्यावेळी तरी हे काम थांबवावं अशी मागणी याचिकाकर्त्यांने केली होती. हायकोर्टाने ती मान्य केलीय. दरम्यान, या आदेशामुळे मेट्रो तीनचं काम पूर्ण होण्यास विलंब होण्याची चिन्हं आहेत.
First published: