मेट्रो-2बीच्या बीकेसीमधील कामामुळे वाहतूक कोंडी,कार्यालयीन वेळा बदलण्याच्या सूचना

मेट्रो-2बीच्या बीकेसीमधील कामामुळे वाहतूक कोंडी,कार्यालयीन वेळा बदलण्याच्या सूचना

मेट्रो-2बीच्या बीकेसीमधील एलिवेटेड भागाचं काम फेब्रुवारीपासून सुरू होतंय.त्या पार्श्वभूमीवर बीकेसीमध्ये वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, एमएमआरडीएनं बीकेसीमधील कार्यालयांना वेळा बदलण्याची सूचना केली आहे.

  • Share this:

17 नोव्हेंबर : मेट्रो-2बीच्या बीकेसीमधील एलिवेटेड भागाचं काम फेब्रुवारीपासून सुरू होतंय.त्या पार्श्वभूमीवर बीकेसीमध्ये वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, एमएमआरडीएनं बीकेसीमधील कार्यालयांना वेळा बदलण्याची सूचना केली आहे.

डीएन-नगर ते मानखुर्द या मेट्रोमार्गाच्या जवळपास साडेतीन किमीचा टप्पा बीकेसीतून जातो तो पूर्णपणे एलिव्हेटेड असणार आहे.ज्यामुळे बीकेसीतील आठपैकी 2  मार्गिका किमान दोन वर्षांकरिता पूर्णपणे बंद राहणार आहे. परिणामी बीकेसीत ट्राफिक जामची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

बीकेसी परिसरात मोठ्या प्रमाणावर शासकीय आणि खासगी कार्यालयं आहेत.त्यामुळे सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळी जवळपास साडेसहा लाख लोकांची वर्दळ इथे असते.या कार्यालयांना वेळ बदलण्यासंदर्भात एमएमआरडीए अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी बीकेसीमधील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी सूचना केल्या. त्यामुळे काही कार्यालयांना सकाळी 8 वाजता सुरू करण्याच्या तर काही ऑफिसेस दुपारी 11पर्यंत सुरू करण्याची सूचना केली आहे.

बीकेसी मेट्रो -2 बी प्रकल्प

- बीकेसीचं क्षेत्रफळ 19 हेक्टर

- रोज 6.5 लाख कर्मचाऱ्यांची ये-जा

- बीकेसीतील रस्त्यांची लांबी 20 किमी

- बीकेसीतील कार्सची वाहतूक दररोज 20 हजार

- बीकेसीतील इमारतींची संख्या 200

- महत्त्वाची कार्यालयं - आरबीआय, आयकर, पीएफ, भारत डायमंड बोर्स, आयसीआयसीआय, नाबार्ड, सिटीबँक

- सेव्हन स्टार हाॅटेल्स, मोठमोठे हॉस्पिटल्स आणि खासगी कंपन्यांची हेडऑफिसेस

- बीकेसीमध्ये प्रवेशासाठी वेस्टर्न रेल्वेचं वांद्रे स्टेशन आणि मध्य रेल्वेचं कुर्ला स्टेशन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 17, 2017 10:19 AM IST

ताज्या बातम्या