मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

MeToo प्रकरणी तनुश्री दत्ताची बाजू मांडणाऱ्या वकिलावर विनयभंगाचा आरोप

MeToo प्रकरणी तनुश्री दत्ताची बाजू मांडणाऱ्या वकिलावर विनयभंगाचा आरोप

नितिन सातपुते आले आणि कानात म्हणाले, 'अश्लिल कृत्य करेल तेव्हा तुला समजेल'.

नितिन सातपुते आले आणि कानात म्हणाले, 'अश्लिल कृत्य करेल तेव्हा तुला समजेल'.

नितिन सातपुते आले आणि कानात म्हणाले, 'अश्लिल कृत्य करेल तेव्हा तुला समजेल'.

  • Published by:  Sandip Parolekar

मुंबई,3 जानेवारी: MeToo प्रकरणात बॉलीवूडची अभिनेत्री तनुश्री दत्ता हिची बाजू मांडणारे वकील नितिन सातपुते (Nitin Satpute) यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. पीडित महिला देखील वकील असून तिने नितिन सातपुते यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून मुंबईतील खेरवाडी पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. नितिन सातपुते हे मुंबई हायकोर्टातील प्रसिद्ध वकील आहेत. तनुश्री दत्ता हिचे MeToo तसेच केएम हॉस्पिटलमधील ज्यूनियर डॉक्टर पायल आत्महत्या प्रकरणात नितिन सातपुते हे पीडित पक्षाचे वकील आहे.

एकाच सोसायटीत राहतात..

पीडित महिला आणि वकील नितिन सातपुते हे एकाच सोसायटीत राहतात. गेल्या वर्षी सप्टेंबर 2019 मध्ये झालेल्या मीटिंगमध्ये तक्रारदार महिलेने नितिन सातपुते यांच्या निवासस्थानासमोर बनवलेल्या गार्डनवर आक्षेप घेतला होता. नितिन सातपुते यांनी बनवलेले गार्डन काढून त्या जागेवर लहान मुलांसाठी खेळण्याचे पटांगण बनवावे, असेही तक्रारदार महिलेने म्हटले होते. यावरून नितिन सातपुते नाराज झाले होते. यावरून तक्रारदार महिला आणि नितिन सातपुते यांच्यात बाचाबाचीही झाली होती. नितिन सातपुते यांनी 2 नोव्हेंबर 2019 रोजी लिफ्टमध्ये घुसून पीडित महिलेच्या नातेवाईकांना धमकावले होते. नंतर फोनवरूनही धमकी दिली होती.

'अश्लिल कृत्य करेल तेव्हा तुला समजेल'

पीडित महिलेने या प्रकरणी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दिली आहे. परंतु, नितिन सातपुते 27 नोव्हेंबरला आयोगासमोर हजर झाले नाही. 30 डिसेंबर 2019 रोजी नितिन सातपुते यांनी वांद्रे येथे महिला आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. पीडिता राज्य महिला आयोगाच्या कार्यालयाबाहे उभी होती. तितक्यात नितिन सातपुते आले आणि कानात म्हणाले, 'अश्लिल कृत्य करेल तेव्हा तुला समजेल'. यानंतर पीडितेने खेरवाडी पोलिस स्टेशनमध्ये नितिन सातपुते यांच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार दिली.

First published: